महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आंबोलीत थार झाडाला आदळली ; एक जागीच ठार

06:57 PM Jan 03, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सहा जण जखमी 

Advertisement

आंबोली नांगरतास येथे थार गाडी  झाडाला आदळली 

Advertisement

वार्ताहर/ आंबोली

आंबोली नांगरतास येथे महेंद्रा थार कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात लातूर येथील सहाजण जखमी झाले.तर ,एक जण मयत झाला. ही घटना साडेचार  वाजण्याच्या सुमारास आंबोली नांगरतास आराध्य हॉटेल येथे घडली. हे सर्वजण येरमळा -धाराशीव लातूर येथून गोवा येथे चालले होते. गाडीचा वेग एवढा जास्त होता की रस्त्यालगतचे झाड उन्मळून पडले. आणि गाडीच्या संपूर्ण दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. ड्रायव्हर बाजुस बसलेला दत्ता व्यंकट जाधव वय -३५ हा मयत झाला असून इतर सहाजण जखमी झाले आहेत. त्यातीत दोनजण गंभीर जखमी झाले. तर इतर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी झालेले महादेव भगवान बांगर वय३२ रा येरमळा जी. धाराशीव, गणेश दिलीप साळुंखे वय२२ रा जामखंडे ता. अहमदनगर, बालाजी भगवान बांगर वय४० रा. येरमळ ता कळंब जि धाराशीव, सुनिल कृष्णा कुलभैया वय३१ रा शिरोळ जि बीड, नवनाथ विठोबा जाधव वय३९ रा केज जि. बीड, विष्णू अंकूश बांगर वय२२ रा येरमळा जि. धाराशिव असे जखमी झाले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना सावंतवाडी कुटीर रुग्णालयात पाठविण्या आले. आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जगदीश दुधवाडकर, पो नाईक मनिष शिंदे यांनी सुनिल नार्वेकर, मायकर डिसोजा, अजय नार्वेकर आणि ग्रामस्थांच्या मदतीने आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.

Advertisement
Tags :
# Accident in amboli # tarun Bharat news update #
Next Article