kolhapur : जोतिबावरून परतताना अंबप फाट्यावर अपघात; किरकोळ जखमी
अंबप फाटा येथे अल्टोला कंटेनरची धडक
अंबप : पुणे–बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावरून हातकणंगले तालुक्यातील अंबप फाटा येथे ज्योतिबावरून आष्टा ला जाणार्या अल्टो कारला कंटेनरची धडक बसली. सुदैवाने किरकोळ जखमी वगळता जीवितहानी टळली. सांगली जिल्ह्यातील आष्टा जवळील बावची येथील यादव कुटुंब घरी लग्न समारंभाचा कार्यक्रम असल्याने आपल्या अल्टो कारमधून जोतिबाला पत्रिका ठेवण्यासाठी आले होते.
परत जाताना पुणे बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर अंबप फाटा येथे उड्डाणपुलाच काम सुरू असलेल्या हॉटेल रविराजच्या समोर आले असता त्यांना कंटेनरची धडक बसली प्रसंगावधान राखत चालकाने गाडीवर नियंत्रण ठेवले. यामुळे सुदैवाने मोठा अपघात टळला. पेठ वडगांव पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांची कोंडी झाली होती. अबप फाटा येथील उड्डाणपूलाचे काम कधी पूर्ण होणार याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.