कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तडजोड मान्य करा, अथवा सत्तापालट होईल!

06:47 AM Nov 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाकिस्तानची तालिबानला धमकी : अफगाणच्या नाराज नेत्यांच्या मदतीने रचतोय कट

Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

Advertisement

अफगाणिस्तानसोबत तणावादरम्यान पाकिस्तान आता तालिबानला सत्तापालटाची धमकी देऊ लागला आहे. अफगाणिस्तानने तडजोडीचा मार्ग मान्य न केल्यास आणि सुरक्षेशी संबंधित आमच्या सर्व मागण्या मान्य न केल्यास तालिबानने सत्तापालटाची तयार रहावे. काबूलमधील सत्तेला आव्हान देणाऱ्या शक्तीला आम्ही समर्थन देऊ असे पाकिस्तानने म्हटले आहे.

पाकिस्तानने मध्यस्थी करणाऱ्या तुर्कियेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तालिबानला ही धमकी दिली अहे. अफगाणच्या भूमीवर तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानला स्थान मिळू नये अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. तर अफगाणिस्तान तालिबानने टीटीपीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्याची भूमिका घेतली आहे. आमच्या भूमीचा वापर दहशतवादासाठी होऊ देणार नसल्याचे अफगाणिस्तानचे सांगणे आहे. याचमुळे कुठल्याही प्रकारच्या लेखी करारावर अफगाणिस्तानने स्वाक्षरी केलेली नाही.

माजी अध्यक्षांशी संपर्क

अफगाणिस्तानची भूमिका स्वत:साठी धोका ठरल्याचे पाकिस्तानला वाटतेय. पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा आता अफगाणिस्तानातील यापूर्वीच्या सरकारच्या नेत्यांशी संपर्क साधू लागल्या आहेत. यात माजी अध्यक्ष हामिद करजाई, अशरफ गनी, अहमद मसूद यासारखे नेते सामील आहेत. याचबरोबर अफगाणिस्तान फ्रीडम फ्रंट आणि नॉर्दर्न अलायन्सचे अब्दुल राशिद दोस्तम यांच्याशीही संपर्क साधला जात आहे. पाकिस्ताने या नेत्यांना आश्रयाचे आश्वासन दिले. पाकिस्तानच्या भूमीवरून या नेत्यांनी अफगाणिस्तानात सत्तापालट घडविण्याचे प्रयत्न करावेत असा प्रयत्न सुरू आहे.

पाकिस्तानची मागणी

तुर्किये आणि कतारच्या मध्यस्थीत तीनवेळा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान चर्चा झाली आहे, परंतु यातून कुठलाच परिणाम निघालेला नाही. तालिबानने टीटीपी विरोधात कठोर कारवाई करावी अशी पाकिस्तानची मागणी आहे. तसेच डूरंड रेषेवर बफर झोन निर्माण करण्यात यावा असे पाकिस्तानचे सांगणे आहे. याचदरम्यान पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या सरकारने अफगाण शरणार्थींना हाकलण्याची मोहीम तीव्र केली आहे. चालू महिन्यात आतापर्यंत 6 हजारांहून अधिक लोकांना अफगाणिस्तानात परत पाठविण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article