महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सामाजिक वनीकरणातर्फे रोप लागवडीला वेग

06:26 AM Jul 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जमिनीत पुरेसा ओलावा : रस्त्यांच्या दुतर्फा लागवड : हिरवळ डोलणार

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

पर्यावरणाचा समतोल राहावा आणि झाडांची संख्या वाढावी यासाठी सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवड केली जात आहे. यंदाच्या हंगामात 30 हजारहून अधिक रोप लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दमदार पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे विविध भागात वृक्ष लागवडीला वेग आला आहे.

वनखाते आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत दरवर्षी लाखो रोपांची लागवड केली जाते. यंदाच्या हंगामात रस्त्यांच्या दुतर्फा आणि इतर ठिकाणी ही लागवड होत आहे. विशेषत: जांभूळ, फणस, वड, कडीपत्ता, बेल आदी रोपांचा यात समावेश आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, सरकारी शाळा, खुल्या जागा, सरकारी जागा आदी ठिकाणी लागवड केली जात आहे.

अलीकडच्या काही वर्षात वृक्षांची तोडणी कमी झाली आहे. त्यामुळे साहजिकच वृक्षांची संख्या टिकून आहे. त्याचबरोबर दरवर्षी वृक्ष लागवडीवर भर दिला जात आहे. यासाठी रोजगार हमी योजनेची मदत होऊ लागली आहे. गतवर्षी 25 हजार रोपांची लागवड करण्यात आली होती. यंदा त्यात वाढ झाली असून 30 हजार रोपे लावली जाणार आहेत. सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी वृक्ष लागवडीत गुंतले आहेत. रोप लागवडीबरोबरच झाडांच्या सुरक्षिततेसाठी कुंपण घातले जात आहे.

निसर्गाचा समतोल राखणे गरजेचे

तालुक्यातील विविध गावांमध्ये यंदा 30 हजार रोपांची लागवड केली जाणार आहे. वृक्ष लागवडीला प्रारंभ झाला आहे. रस्त्यांच्या दुतर्फा आणि इतर ठिकाणी लागवड होत आहे. स्थानिक नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे. निसर्गाचा समतोल राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे.

-गिरीश इटगी (सामाजिक वनीकरण विभाग अधिकारी)

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article