महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जारी

11:38 AM Jan 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : शिक्षण संचालनालयाने येत्या शैक्षणिक वर्षाचे (2024-25) वेळापत्रक जारी केले आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी हे वेळापत्रक आहे. त्यासंबंधी परिपत्रक सर्व शाळांना पाठविण्यात आले आहे. प्रथम सत्र दि. 4 जून ते 26 ऑक्टोबर 2024 तर दुसरे सत्र दि. 18 नोव्हेंबर ते 30 एप्रिल 2025 या दरम्यान असेल. शैक्षणिक कालावधी 200 दिवसांपेक्षा कमी नसावा आणि शालेय कामाचे दिवस 220 पेक्षा कमी नसावे, असे परिपत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे. दि. 6 ते 12 सप्टेंबर दरम्यान चतुर्थी सुट्टी, दि. 28 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर दिवाळी सुट्टी आणि दि. 24 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025  पर्यंत नाताळची सुट्टी असेल. हिवाळी सुट्टी दि. 1 मे ते 3 जून 2025 दरम्यान असेल. उर्वरित अन्य सार्वजनिक सुट्ट्या संबंधित तारखेनुसार असतील. तसेच सरकारी पातळीवर जाहीर करण्यात येणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्याही शाळांना लागू होणार आहेत.  त्याव्यतिरिक्त आणखी 10 सुट्ट्या घोषित करण्याचे अधिकार शाळा प्रमुखांना असतील. संबंधित पालक-शिक्षक संघांशी चर्चा केल्यानंतर त्या जाहीर करता येतील, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article