For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसीए, युनायटेड बालाजी संघ विजयी

09:59 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
एसीए  युनायटेड बालाजी संघ विजयी
Advertisement

बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित एन. डी. वॉरियर्स चषक निमंत्रितांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात एसीए क्रिकेट अकादमीने टिळकवारी अकादमीचा व युनाटेड बालाजीने एमसीसीचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. समेद बेल्लद व  रवी जयराम याना सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भुतरामहट्टी येथील भगवान महावीर स्कूलच्या टर्फ मैदानावर खेळविण्यात आलेल्या  पहिल्य सामन्यात टिळकवाडी अकादमी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी बाद धावा केल्या. त्यात ओमकार पाटील रोहित पोडवाल यांनी 3 चौकारांसह प्रत्येकी 25 तर शिवम यादवने 12 धावा केल्य. एसीएतर्फे  समेद बेल्लद व किरण पुजारी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसीए संघाने 19.1 षटकात 5 गडी बाद 137 धावा करून सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात इdरमाण सय्यदने 1 षटकार व 7 चौकारांसह 40, प्रसाद सुगूरने 3 चौकारांसह 27 तर कियण पुजरीने 14 धावा केल्या. दिळकवाडी तर्फे ओमकार व शिवलिंग यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात एमसीसीने प्रथम फलंदाजी करताना 18.5 षटकात सर्व गडी बाद 99 धावा केल्य. त्यात प्रेम इंगळेने 18 तर शहाबाज पठाणने 16 धावा केल्या. युनायटेड बालाजीतर्फे आनंद, अजित व वासू यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनायटेड बालाजी संघाने 15 षटकात 4 गडी बाद 102 धावा करुन सामना 6 गड्यांनी जिकला. त्यात रवि जयरामने 2 षटकार 2 चौकारांसह 29, नागराज रोट्टीने 1 षटकार व 2 चौकारांसह 22 तर शिवप्रसाद हिरेमठने 1 षटकार व 2 चौकारांसह 20 धावा केल्या. एमसीसी तर्फे तारिक अहमदने 2 तर अरसलानने 1 गडी बाद केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.