For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सत्तेचा गैरवापर म्हणजे नक्षलवाद

06:40 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
सत्तेचा गैरवापर म्हणजे नक्षलवाद
Advertisement

ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका

Advertisement

► प्रतिनिधी/ मुंबई

सरकारी यंत्रणेचा गैरवापर करुन दुसऱ्यांना पक्षात घेणे हा नक्षलवाद नाही का? हा शासकीय नक्षलवाद आहे. सत्तेsचा दुरुपयोग करणे, विरोधीपक्ष फोडणे हे शहरी नक्षलवादापेक्षा भयानक असून लोकशाहीची हत्या करणारा नक्षलवाद आहे. तसेच सत्तेसाठी भाजपाने हिंदूत्व सोडले असे म्हणत चंद्राबाबू नायडू, नितीशकुमार हे हिंदुत्ववादी आहेत का? नायडू आणि नितिशकुमारांचा जाहीरनामा वाचल्यास त्यांनी मुस्लिमांना दिलेल्या आश्वासने समजतील. ती मोदी पूर्ण करणार आहेत का? असे सवाल करत जर हिंमत हरलो तर पुन्हा जिंकणार नाही. तुम्हा कोणालाच हिंमत हाऊ देणार नाही, अशी शपथच ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसैनिकांना दिली. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या 58 व्या वर्धापन दिनी षण्मुखानंद सभागृहात शिवसैनिकांशी संवाद साधत होते.

Advertisement

यावेळी ठाकरे म्हणाले की, शिवसेना म्हणजे चैतन्य आणि तरुणाई असल्याचे सांगत ज्या देशभक्तांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेला मतदान केले, अशा हिंदू, बौद्ध, मुस्लिम आणि ख्रिश्चन अशा सर्वांचे आभार मानले. यशाचे धनी शिवसैनिक असल्याचे सांगत मोदींमध्ये अहंकार माजला असल्याचे म्हणाले. आता निवडणुकाच्या निकालाचे विश्लेषण सुरु असून भाजपाला तडाखा बसला असल्याचे समोर येत आहे. मात्र त्यांनी विषयांतर सुरु करून उद्धव हे मोदींसोबत किंवा एनडीएसोबत जाणार अशी चर्चा सुरु केली. मात्र ज्यांनी शिवसेनेला संपवायचा प्रयत्न केला त्यांच्या सोबत कदापी जाणार नसल्याचे ठाकरे म्हणाले.

बाळासाहेबांचे फोटो लावून स्ट्राईक रेट वाढवला

स्ट्राईक रेटवर बोलताना ठाकरे म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांचा फोटो, शिवसेनेचे नाव, तसेच धनुष्यबाण चिन्ह न घेता निवडणूक लढा. आम्ही ही निवडणूक शिवसेनाप्रमुखांचा फोटो लावून लढलो. त्यांच्याशिवाय दुसरा फोटो लावला नाही. यापुढे वापरणार नाही. मोदींचा तर अजिबात नाही, असे सांगत ठाकरे यांनी मिंध्याच्या वडिलांचा फोटो लावा आणि आमच्या सोबत लढा. बाळासाहेबांचे फोटो लावून स्ट्राईक रेट का सांगता असा सवाल विचारला.

राजवर हल्लाबोल

यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीने आपले कोण शत्रू कोण हे दाखवून दिले. काहींनी उद्धव ठाकरे नको म्हणून बिनशर्ट पाठींबा दिला आहे. काहींनी भाजपाला विरोध करुन पाठींबा दिला, असे सांगून राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.  महाराष्ट्रातील निवडणूक दहा टप्प्यात हवी होती. रोज यांची सालटी काढली असती असे म्हटले. दरम्यान तुम्ही प्रेमाने वागल्यास आम्ही प्रेमाने वागू. उलट वागलात तर वाघनखं काढू. मुनगुंटीवार पुन्हा वाघनखं आणायला गेले असल्याचे सांगत ही भगव्याची थट्टा असल्याचे ठाकरे म्हणाले. आपण भगव्यात भेद करणार नसून छत्रपतींच्या भगव्यावर कोणतेही चिन्ह न टाकण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले. तसेच आता विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने नवे प्रभारी नेमले असून देशाच्या मंत्र्यांना पक्षाचे काम केले तर देश कोण चालवणार असा सवाल विचारला. तसेच पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणारे जाऊ द्या ना घरी वाजवले की बारा असे म्हणत असल्याचे फडणवीस यांचे नाव न घेता ठाकरे म्हणाले.

पराभवाचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही

दरम्यान पंतप्रधान दत्तक गाव योजनेत तरी तुमच गाव बसलय का असा सवाल करत अनैसर्गिक युती म्हणून टीका करणाऱ्याना चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यायुतीला नैसिर्गक युती म्हणणार का असा सवाल विचारला. तर नितीशकुमारांना संघमुक्त भारत हवे होते. त्यांच्याशी मोदी बसले आहेत. तर मांजीनी राम काल्पनिक असल्याचे म्हटल्याची आठवण कऊन दिली. काही ठिकाणी हरलो त्या ठिकाणचा पराभव जिव्हारी लागला आहे. त्या पराभवाचा वचपा काढल्याशिवाय राहणार नसल्याची शपथ ठाकरे यांनी शिवसैनिकांना  दिली.

Advertisement
Tags :

.