ओलवण येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार ! संशयित ग्रा. पं. कर्मचाऱ्यास अटक
राधानगरी पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील ओलवण येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित ग्रामपंचायत कर्मचारी संतोष शामराव पाटील (वय 30, रा. ओलवण) याला गुऊवारी राधानगरी पोलिसांनी अटक केली.
याप्रकरणी पोलिसांकङून मिळालेली माहिती अशी, संशयित आरोपी संतोष पाटील व पीडित अल्पवयीन मुलगी ओळखीचे आहेत. सुमारे एक वर्षापासून पीडित मुलीला ग्रामपंचायत ओलवण व दाजीपूर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील झोपडीत बोलावून तिच्यावर मार्च 2023 पासून जबरदस्तीने संबंध ठेवले. पीडितेच्या पोटात दूखू लागल्याने नातेवाईकांनी तिला कणकवली येथे डॉक्टरांकडे नेऊन तपासणी केली असता ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे समजले. त्यानंतर पीडितेने संशयित आरोपी संतोष पाटील याच्याविरोधात प्रथम कणकवली पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राधानगरी पोलिसांनी गुऊवारी गुन्हा दाखल करून अटक केली. तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.