महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

रियासी हल्ल्याचा अबु हमजाने रचला कट

06:37 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एनआयए, एसआयएने घटनास्थळावरून मिळविले पुरावे

Advertisement

वृत्तसंस्था/ जम्मू

Advertisement

जम्मू विभागातील रियासी जिल्ह्याच्या शिवखोडी धाम येथून परतत असलेल्या भाविकांवर बसवर रविवारी झालेल्या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचे तीन पाकिस्तानी दहशतवादी सामील होते. या हल्ल्याचा कट लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबु हमजाने रचला होता. या हल्ल्याकरता एम-4 रायफलचा वापर करण्यात आला आहे. दहशतवाद्यांच्या शोधाकरता आता ड्रोन्स आणि श्वानपथकाच्या मदतीने जंगलात मोहीम हाती घेण्यात आली आहे. एनआयए तसेच राज्य तपास यंत्रणेच्या पथकाने घटनास्थळाचा दौरा करत आवश्यक पुरावे जमविले आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी चौथा दहशतवादी उपस्थित होता  ही शक्यता फेटाळता येणार नाही. चौथा दहशतवादी तीन दहशतवाद्यांना संरक्षण पुरवत होता असे सुरक्षा दलांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हल्ला केल्यावर दहशतवाद्यांनी रियासी आणि राजौरीला लागून असलेल्या जंगलाच्या उंच पर्वतांवर आश्रय घेतला असल्याचा संशय आहे. या दहशतवाद्यांना शोधण्याकरता मोहीम गतिमान करण्यात आली आहे. तपास यंत्रणांनी हल्ल्यातून बचावलेल्या भाविकांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. शोधमोहिमेत गाव सुरक्षा समितीच्या सदस्यांनाही सामील करण्यात आले आहे. पूर्ण परिसर तपासण्यात येत आहे. संशयितांची देखील चौकशी करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहिता शर्मा यांनी सांगितले.

उत्तरप्रदेशचे 3 तर राजस्थानचे 4 भाविक ठार

53 आसनी बसवर झालेल्या हल्ल्यात स्थानिक चालक-कंडक्टरसोबत उत्तरप्रदेशचे तीन आणि राजस्थानच्या एकाच कुटुंबातील 4 जणांसमवेत 9 जणांचा मृत्यू झाला होता. याचबरोबर 41 जण जखमी झाले होते. यातील 10 जखमींना गोळी लागली होती.

तपासासाठी 11 पथकांची निर्मिती

पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी 11 पथकांची स्थापना केली आहे. आम्हाला काही प्रमाणात सुगावा लागला असून त्यानुसार तपास केला जात आहे. हल्ल्यात किती दहशतवादी सामील होते हे सांगणे आता घाईचे ठरेल. इनपूट मिळत असून त्यानुसारच आम्ही पुढील कारवाई करणार आहोत असे पोलीस उपमहानिरीक्षक (उधमपूर क्षेत्र) रईस मोहम्मद भट यांनी सांगितले आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या भाविकांची रुग्णालयात भेट घेतली आहे. तर केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने हल्ल्यात मारले गेलेल्या भाविक आणि बसचालक तसेच कंडक्टरच्या परिवाराला प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत  जाहीर केली आहे. तर जखमींच्या उपचारासाठी 50 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.

पाकिस्तानविरोधात निदर्शने, बाजारपेठ बंद

दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात पूर्ण जम्मू क्षेत्रात संतापाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी निदर्शने होत असून पाकिस्तानचे ध्वज जाळण्यात आले. हल्ल्याच्या विरोधात राजौरीच्या तरयाठमध्ये बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. तर उधमपूर समवेत रियासी, कटडा, किश्तवाड, भद्रवाह, डोडा आणि रामनगरमध्येही निदर्शने झाली आहेत. लोकांनी मोर्चा काढत पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. शिवखोडी धामचे शिबिर पूर्णपणे बंद ठेवत निषेध नोंदविण्यात आला.

देशात हिंसा भडकविण्याचा कट

रियासी येथे झालेला दहशतवादी हल्ला  जम्मू-काश्मीरच्या शांत भागांमध्ये अशांतता निर्माण करण्यासोबत देशाच्या विविध भागांमध्ये सांप्रदायिक हिंसा फैलावण्याचा कट होता. दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी निवडलेली वेळ आणि स्थान अत्यंत विचारपूर्वक निवडले होते. हल्ल्याद्वारे खळबळ उडवून देण्याचा त्यांचा कट होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथ ग्रहण करण्याच्या एक तासापूर्वी हा दहशतवादी हल्ला झाला होता. तर भाविकांना लक्ष्य करत उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि बिहार यासारख्या राज्यांमध्ये हिंसा घडवून आणण्याचा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचा कट होता असे समोर आले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article