Solapur : पहिल्या दिवशी अर्जदारांची अनुपस्थिती; मंगळवेढा नगरपरिषद निवडणूक चर्चेत
मंगळवेढा निवडणूक अर्ज प्रक्रियेत उशीर
मंगळवेढा : नगरपरिषद निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सोमवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, पहिल्याच दिवशी मंगळवेढा नगरपरिषदेसाठी उमेदवाराकडून एकही अर्ज दाखल न झाल्याची माहिती निवडणूक विभागातून देण्यात आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
अर्ज दाखलकरण्याचा पहिला दिवस शांततेत गेला. सकाळपासून दुपारपर्यंत अर्जदारांनी माहिती घेण्यासाठी निवडणूक कार्यालयात उपस्थित लावली, मात्र कोणताही उमेदवार प्रत्यक्ष अर्ज घेऊन आला नाही शिवाय विविध पक्षांचे स्थानिक नेते संभाव्य उमेदवार कार्यालयात फिरताना दिसले, परंतु अधिकृत एक ही अर्ज दाखल करण्यात आला नाही.
राजकीय जाणकारांच्या मते प्रभाग रचनेत झालेल्या बदलांमुळे अनेक उमेदवार संभ्रमात आहेत. पक्षांतराचे वारे सुरू असल्याने अंतिम नावांची घोषणा प्रलंबित आहे. पक्षांतर्गत तिकीटवाटपासाठी अजूनही चर्चाच सुरू आहेत. या सर्वांचा परिणाम अर्ज दाखल प्रक्रियेवर दिसून आला. अधिकाऱ्यांची पूर्ण तयारी, परंतु उमेदवारांकडून प्रतिसाद नाही. नगरपरिषद निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांनी दिवसभर अर्ज स्वीकृतीसाठी तयारी ठेवली होती. सुरक्षा व्यवस्था, व्हिडिओ रेकॉडिंग, नामनिर्देशन कक्षांची व्यवस्था याबाबत कोणतीही कमतरता नव्हती.