फरार हर्षित जैनचे युएईमधून प्रत्यार्पण
06:45 AM Sep 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
आता सीबीआयकडून तपास होणार
Advertisement
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
केंद्रीय अन्वेषण ब्युरोने गुजरात पोलीस, परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या सहकार्याने मोठे यश मिळवले आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने युएईमधून वॉन्टेड फरारी हर्षित बाबूलाल जैनचे प्रत्यार्पण केले आहे. कर चुकवणे, बेकायदेशीर जुगार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात हर्षित बाबूलाल जैन हा वाँटेड होता. यापूर्वी, 9 ऑगस्ट 2023 रोजी गुजरात पोलिसांच्या विनंतीवरून, सीबीआयने इंटरपोलद्वारे हर्षित जैनविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. आता हर्षित जैनला युएईहून भारतात आणण्यात आले असून शुक्रवारी अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुजरात पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी इंटरपोल चॅनेलद्वारे समन्वय साधून गेल्या काही वर्षांत 100 हून अधिक वॉन्टेड गुन्हेगारांना भारतात परत आणण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement