For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

किसान ड्रोन केंद्राबाबत उसगाव ‘नंबर वन’

03:32 PM Dec 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
किसान ड्रोन केंद्राबाबत उसगाव ‘नंबर वन’
Advertisement

केंद्र सरकारने बचत गटांसाठी सुरू केलेल्या योजनेचा महिलांनी घेतला लाभ

Advertisement

पणजी : केंद्र सरकारने शेतीच्या विकासात भरीव योगदान देण्याबरोबरच ग्रामीण भागातील शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अभिनव संकल्पना राबविली होती. या संकल्पनेतूनच केंद्राने देशातील महिला बचत गटांना सुमारे 1 हजार 261 कोटी ऊपयांची ड्रोन पॉलिसी ही योजना राबवली. योजनेचा पुरेपूर लाभ उठविताना उसगाव-फोंडा येथील महिला बचत गटाने किसान ड्रोन केंद्र सुरू केले. हे केंद्र सुरू करण्याचा पहिला मान देशात उसगाव येथील या महिला बचत गटाने मिळविला आहे. स्वयंसहाय्य गटांना ड्रोन चालविण्याबाबत सर्वप्रकारचे प्रशिक्षण देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट्या होते. हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून उसगावच्या महिला बचत गटाने प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्र सुरू केले. ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशके आणि खते फवारणीचे प्रशिक्षण महिला बचत गटांना दिले जाणार असून, यामध्ये उसगावच्या महिला बचत गटाचा प्रथम सहभाग नोंद झाला आहे.

ड्रोनची किंमत प्रत्येकी 10 लाख ऊपये इतकी आहे. खर्चाच्या 80 टक्के वाटा केंद्र सरकार स्वत: उचलणार आहे. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वऊपात दिली जाणार आहे. केंद्र सरकारने नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देशभरातील महिला बचत गटांना महिला किसान केंद्र सुरू करण्याचे आवाहन केले होते. तसेच यासाठी देशभरातील महिला बचत गटांना 15 हजार ड्रोन देण्यासाठी सुमारे 1 हजार 261 कोटी ऊपयांच्या योजनेला मंजुरी दिली होती. देशात महिला किसान केंद्र सुरू झाल्यास त्याचा फायदा शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होणार आहे. ड्रोनच्या सहाय्याने शेतीला पाणी देणे अगदी सहज व सुलभ पद्धतीने होणार आहे. शेतीतील पिकांना पाण्याची गरज आहे, त्यासाठी हे ड्रोन उपयोगात आणले जाणार आहेत. उसगावच्या महिला बचत गटाने हे केंद्र सुरू करून देशात आदर्श निर्माण केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.