महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

देशात जवळपास 97 कोटी मतदार

06:28 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुमारे 97 कोटी भारतीय मतदार आपला मौल्यवान हक्क बजावण्यासाठी पात्र असल्याची माहिती निवडणूक आयोगाने शुक्रवारी जारी केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपासून नोंदणीकृत मतदारांची संख्या सहा टक्क्मयांनी वाढली आहे. याचदरम्यान 18 ते 29 वर्षे वयोगटातील दोन कोटींहून अधिक तऊण मतदारांना मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

Advertisement

देशात लवकरच 2024 च्या लोकसभा निवडणुका होणार आहेत. ही संपूर्ण जगातील सर्वात मोठी लोकशाही निवडणूक असणार आहे. निवडणूक आयोग फेब्रुवारी महिन्यातच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो, असे मानले जात आहे. अशा परिस्थितीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशातील किती लोक मतदान करण्यास पात्र आहेत याची माहिती भारतीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी प्रसिद्ध केली. भारतातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान करण्यासाठी जगातील सर्वात मोठे 96.88 कोटी मतदार नोंदणीकृत झाल्याचा अहवाल निवडणूक आयोगाने दिला आहे. यासोबतच आयोगाने पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांची संख्याही जाहीर केली आहे.

नवा विक्रम नोंद होणार

निवडणूक आयोगाच्या मते जगात सर्वाधिक मतदार भारतात आहेत. भारतात एवढ्या मोठ्या संख्येने लोक मतदान करतील तेव्हा हा एक विक्रम ठरेल. भारतातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान करण्यासाठी जगातील सर्वाधिक मतदार (96.88 कोटी) नोंदणीकृत असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. मतदार यादीच्या पुनरिक्षणात पारदर्शकतेला महत्त्व देण्यात आले असून यादीच्या अचूकतेकडे पूर्ण लक्ष देण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय, देशातील लिंग गुणोत्तर 2023 मधील 940 वरून 2024 मध्ये 948 वर पोहोचल्याची माहिती आयोगाने दिली आहे. 2019 मध्ये हे लिंग गुणोत्तर 928 होते.

नवमतदारांमध्ये महिला अधिक

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मतदार यादीच्या पुनरिक्षणातील विविध कामांसोबतच राजकीय पक्षांच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागाची माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, या लोकसभा निवडणुकीत मतदार यादीच्या पुनरिक्षणाच्या निकालात सहा टक्के नवीन मतदारांची भर पडल्याचे दिसून येते. यामध्ये महिलांचा सहभाग जास्त आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 66.76 टक्के मतदार तऊण म्हणजेच प्रौढ लोक आहेत. आयोगाच्या आकडेवारीनुसार 2.63 कोटी नवीन मतदारांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 1.41 कोटी महिला मतदार आहेत. तर यातील पुऊष मतदारांची संख्या केवळ 1.22 कोटी आहे.

100 वर्षांवरील 2 लाख मतदार

घरोघरी जाऊन माहिती गोळा केल्यानंतर 1 कोटी 65 लाख 76 हजार 654 मतदारांची नावे यादीतून एकतर वगळण्यात आली आहेत किंवा स्थलांतरित करण्यात आली आहेत. 8 फेब्रुवारी 2024 पर्यंत देशात एकूण 96 कोटी 88 लाख 21 हजार 926 मतदार आहेत. त्यापैकी 49 कोटी 72 लाख 31 हजार 994 पुऊष आहेत. महिलांची संख्या 47 कोटी 15 लाख 41 हजार 888 आहे, तर 48 हजार 044 तृतीय लिंग प्रवर्गातील मतदार आहेत. एकूण मतदारांमध्ये 88 लाख 35 हजार 449 दिव्यांग प्रवर्गात समाविष्ट असून 80 वर्षांवरील 1 कोटी 85 लाख 92 हजार 918 मतदार आहेत. तसेच 100 वर्षांवरील 2 लाख 38 हजार 791 मतदारांची नोंद झालेली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat#akaluj #tarunbharatnews#social media
Next Article