महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हरियाणा विधानसभेसाठी सुमारे 64 टक्के मतदान

07:00 AM Oct 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

5 वाजेपर्यंत 61 टक्के मतदानाची नोंद

Advertisement

वृत्तसंस्था/चंदीगड

Advertisement

हरियाणात विधानसभेच्या 90 जागांसाठी शनिवारी मतदान झाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात 61 टक्के मतदान झाले होते. त्यानंतरही अजून काही कालावधी बाकी राहिल्याने दिवसअखेरपर्यंत जवळपास 64 टक्के मतदान होण्याचा तर्क सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला. हरियाणातील निवडणुकीत मुख्यमंत्री नायबसिंग सैनी, माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुडा आणि काँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगट आणि जेजेपीचे दुष्यंत चौटाला यांच्यासह एकूण 1,031 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. त्यापैकी 464 अपक्ष उमेदवार आहेत.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत राजकीय मैदानात उतरलेल्या प्रमुखांमध्ये मुख्यमंत्री सैनी (लाडवा), विरोधी पक्षनेते हुडा (गढी सांपला-किलोई), आयएनएलडीचे अभयसिंह चौटाला (एलेनाबाद), जेजेपीचे दुष्यंत चौटाला (उचाना कलान), भाजपचे अनिल विज (अंबाला कँट), पॅप्टन अभिमन्यू (नारनौंड), आपचे अनुराग धांडा (कलायत) आणि काँग्रेसच्या विनेश फोगट (जुलाना) यांचा समावेश आहे. भाजपच्या माजी खासदार श्रुती चौधरी आणि अनिऊद्ध चौधरी हे दोघे चुलत भाऊ तोशाम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा

हरियाणामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्र आणि महत्त्वाच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे काही किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. मतदान यंत्रातील तांत्रिक बिघाडामुळे काही ठिकाणी ईव्हीएम यंत्रे बदलावी लागली. राज्यातील 3,460 मतदान केंद्रे संवेदनशील आणि 138 अतिसंवेदनशील असल्यामुळे अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आदर्श आचारसंहितेचे पालन सुनिश्चित करण्यासाठी, राज्याने 507 उ•ाण पथके, 464 स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आणि 32 द्रुत प्रतिक्रिया पथके नियुक्त केली होती. याशिवाय, 1,156 गस्त पथके सक्रियपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून होती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article