महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कामगारांवर लादलेल्या जाचक अटी रद्द करा

10:34 AM May 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बांधकाम कामगारांचे निवेदन : आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी

Advertisement

बेळगाव : बांधकाम कामगारांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. बेंगळूर येथील कामगार कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी जाचक आदेश काढला आहे. तो जाचक आदेश तातडीने रद्द करावा, यासाठी गुरुवारी जिल्हा बांधकाम कामगार संघटनेने कामगार अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. त्यामध्ये जाचक अटी रद्द करा तसेच ज्या अधिकाऱ्याने हा आदेश काढला आहे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करा, अशा मागणीचे निवेदन या बैठकीत देण्यात आले. गुरुवारी मजगाव येथील कामगार कार्यालयामध्ये बैठक झाली. त्यावेळी निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली. नवीन कामगार कार्ड करताना तसेच विवाहाचा निधी हवा असेल तर काम करत असलेल्या घरमालकाने घेतलेल्या परवानगीची प्रत तसेच पगाराची स्लिप द्यावी, अशी जाचक अट घालण्यात आली आहे. त्यामुळे कामगार अडचणीत आला असून तातडीने हा आदेश रद्द करावा, असे यावेळी सांगण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे ज्या अधिकाऱ्याने हा आदेश काढला आहे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करा, अशी जोरदार मागणीही यावेळी करण्यात आली. या बैठकीला कामगार उपायुक्त डी. जी. नागेश, साहाय्यक उपायुक्त अन्सारी यांच्यासमोर ही मागणी करण्यात आली. यावेळी अॅड. एन. आर. लातूर, अॅड. निंगाप्पा मस्ती, अॅड. विनोद पाटील, रमेश काकतीकर, राहुल पाटील, सुनील गावडे, जोतिबा पाटील, सुरेश मऱ्याकाचे यांच्यासह इतर कामगार उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article