अभिषेक म्हणतो, "तुम्ही तुमच्या मुलांचे कधीच मित्र असू नये"
04:20 PM Mar 12, 2025 IST
|
Pooja Marathe
Advertisement
मुंबई
Advertisement
एकीकडे पालकत्त्वाबाबत सल्ले देताना तुम्ही तुमच्या मुलांचे मित्र बना, पालक आणि मुलांच्यामध्ये मोकळा संवाद साधा असे अनेक सल्ले दिले जातात. अशातच अभिषेक बच्चन यांचे पालकांत्त्वा बद्दल केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे.
Advertisement
अभिषेक बच्चन चा बी हॅप्पी हा सिनेमा ओटीटीवर लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एक एफएम रेडीओच्या मुलाखतीत अभिषेक बच्चन पालकत्त्वावर बोलत होता. या मुलाखतीत अभिषेक बच्चन म्हणाले, "तुम्ही तुमच्या मुलांशी मैत्रीपूर्ण नाते ठेवा, पण त्यांचे मित्र बनू नका."
पुढे अभिषेक म्हणाला, "एखाद्या मुलांच्या आयुष्यात त्याच्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण मुलाच्या आयुष्यातील वडीलांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असते. प्रत्येक बाप हा आपल्या भावना अनेकदा मोकळेपणाने सांगू शकत नाही. वडील आईची जागा घेऊ शकत नाहीत."
Advertisement
Next Article