For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यूपी वॉरियर्सचे नवे प्रशिक्षक अभिषेक नायर

06:35 AM Jul 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
यूपी वॉरियर्सचे नवे  प्रशिक्षक अभिषेक नायर
Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisement

स्पर्धेच्या चौथ्या हंगामापूर्वी भारताचे माजी साहायक प्रशिक्षक अभिषेक नायर यांची शुक्रवारी महिला प्रीमियर लीग फ्रँचायझी यूपी वॉरियर्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय पुरुष संघाच्या साहायक प्रशिक्षकपदावरून अलिकडेच काढून टाकण्यात आलेले नायर मागिल तीन हंगामांपासून संघाचे प्रभारी जॉन लुईस वेगळे झाल्यानंतर महिला प्रीमियर लीगमध्ये सामील झाले आहेत.

नायरचा यूपी वॉरियर्सासोबत पहिल्यांदाच निगडित झालेले नाहीत. कारण लीगच्या पहिल्या आवृत्तीनंतर बेंगळूरमध्ये झालेल्या संघाच्या ऑफ-सीझन प्रशिक्षण शिबिरांमध्ये त्यांनी मदत केली होती. त्यांच्या नियुक्तीबद्दल बोलताना नायर म्हणाले, यूपी वॉरियर्ससोबत काम करण्याचा मला खूप आनंद झाला आहे. या संघाची नवीन भूमिका स्वीकारताना मला खूप आनंद होत आहे. डब्ल्यूपीएल हे महिला क्रिकेटसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे आणि मी एक मजबूत संघ तयार करण्यासाठी व्यवस्थापनासोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहे. यूपी वॉरियर्सचा पाया आधीच मजबूत आहे आणि मला विश्वास आहे की आपण खरोखर सर्वजण मिळून संघासाठी काहीतरी नवे बनवू. या संघात अविश्वसनीय क्षमता आहे आणि मी मुंबईचे पहिले विजेतेपद जिंकण्यासाठी माझे सर्वस्व पणाला लावेन,’ असे आय्यर यांनी म्हटले आहे.

Advertisement

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी करत नायरने 2019 मध्ये निवृत्ती घेण्यापूर्वी भारतासाठी तीन एकदिवसीय सामनेही खेळले. तेव्हापासून  त्याने कोचिंगमध्ये स्वताचे नाव कमावले आहे आणि 2024 मध्ये त्यांच्या आयपीएलच्या विजयी मोहिमेदरम्यान कोलकाता नाईट रायडर्सच्या साहायक प्रशिक्षक म्हणून सपोर्ट स्टाफचा भाग होता.

दिनेश कार्तिक आणि केएल राहुलसारख्या अनेक उच्च-प्रोफाइल क्रिकेटपटूंनी नायरने त्यांच्या खेळात आणलेल्या सकारात्मक वळणाबद्दल बोलले आहे. त्यांनी 2018 मध्ये केकेआर अकादमीचे प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे आणि 2022 मध्ये कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये ट्रिनबागो नाईट रायडर्स (टीकेआर) चे मुख्य प्रशिक्षक होते.

Advertisement
Tags :

.