For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनगोळ कलमेश्वर मंदिरात अभिषेक

11:06 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
अनगोळ कलमेश्वर मंदिरात अभिषेक
Advertisement

बेळगाव : श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी अनगोळ ग्रामदेवता श्री कलमेश्वर मंदिर येथे पहाटे शिवालयात विधिवत अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांनी देवाची पूजा-अर्चा करून दर्शन घेतले. यावेळी देवाला चांदीचा मखर मुखवटा घालण्यात आला. गाभाऱ्यात आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दुपारी देवाला महानैवेद्य दाखविण्यात आला. देवाची मूर्ती पालखीत बसवून मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. देवाला गाऱ्हाणे घालण्यात आले. महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने व फुलांनी सजविण्यात आले होते. गावातील हक्कदार, पंच मंडळी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पावसाने दिवसभर हजेरी लावली होती. त्यामुळे यंदा महाप्रसादाचे वाटप कलमेश्वर मंदिर भवन येथे करण्यात आले. प्रसादाचे वाटप करण्यासाठी गावातील युवकांनी सेवा बजावली. गावातील पंच मंडळी, कलमेश्वर मंदिर कमिटी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.