‘अभिधम्म’ दिवस आज साजरा होणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
प्राचीन पाली भाषेला अभिजात भाषेचे स्थान मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी ‘आंतरराष्ट्रीय अभिधम्म दिना’चे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात त्यांच्।s भाषण आयोजित करण्यात आले असून आपल्या भाषणात ते पाली भाषेचे महत्व आणि या भाषेला जोडली गेलेली आपली संस्कृती यांच्या संदर्भात त्यांची मते व्यक्त करणार आहेत. देशाच्या सांस्कृतिक विभागाने ही बुधवारीं ही माहिती दिली.
केंद्र सरकारने नुकताच काही भाषांना अभिजात भाषांचा सन्मान प्रदान केला आहे. या भाषांमध्ये पाली समवेत मराठी, बंगाली आणि आसामी भाषांचा समावेश आहे. पाली भाषेच्या गौरवार्थ ‘अभिधम्म दिन’ प्रतिवर्ष साजरा केला जातो. मात्र यावेळी पाली भाषेला अभिजात भाषेचा सन्मान मिळाल्याने या दिनाला विशेष महत्व प्राप्त झाले असल्याचे मत अनेक पालीदज्ञांनी व्यक्त केले आहे.