महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आबेंची हत्या पोलिसांच्या दुर्लक्षामुळे!

07:00 AM Jul 15, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

टोकियो : जपानचे दिवंगत पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या पोलिसांच्या दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप जपानचे विद्यमान पंतप्रधान फुमिओ इशिदा यांनी केला आहे. शिंजो आबे यांच्यासोबत पुरेशी पोलीस सुरक्षा नव्हती. त्यामुळे मारेकरी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला. त्याने जवळून गोळय़ा घातल्याने शिंजो आबे यांचा मृत्यू झाला. त्यांना पुरेशी पोलीस सुरक्षा व्यवस्था देण्याची जबाबदारी स्थानिक पोलिसांची होती. त्यांनी ती व्यवस्थित पार न पाडल्याने आबे यांना प्राणास मुकावे लागले. त्याचप्रमाणे जपानच्या शांततामय संस्कृतीवरही प्रश्नचिन्ह उमटले. आबे यांच्या हत्येचे पडसाद साऱया जगभरात उमटत असून जपानाची सुरक्षा व्यवस्थाही अभेद्य नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते, असे मत व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article