कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रिव्हॉल्व्हर दाखवत अपहरण करून मारहाण

03:23 PM Aug 23, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

पाचगणी :

Advertisement

थंड हवेचे ठिकाण पाचगणी येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. दि. 17 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता भोसे येथील प्लॉट नं. 59 समोरून संतोष लक्ष्मण शेडगे (रा. भोसे, ता. महाबळेश्वर) यांचे रिव्हॉलव्हर दाखवून अपहरण करण्यात आले. अनोळखी पाच इसमांनी स्वत:ला नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे सांगत शेडगे यांची गाडी अडवली. ‘तुझ्यावर अटक वॉरंट आहे’ असा दम देत मोबाईल हिसकावून घेतला व गाडी महाबळेश्वर पोलीस ठाण्याकडे नेण्याऐवजी थेट पोलादपूरमार्गे मुंबईकडे वळवण्यात आली.

Advertisement

दरम्यान, विरोध करताच पीडितास मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. नंतर तुर्भे येथे भरत अनंत घरत व इतर साथीदारांच्या मदतीने शेडगे यांना घरात ठेवून रात्रभर धमक्या देण्यात आल्या. तसेच बेदम मारहाण करण्यात आली. वाद मिटवा, नाहीतर जेलमध्ये टाकू, अशी थेट धमकी देत जबरदस्तीने तडजोडनामा लिहून घेण्यात आला. मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप शेडगे यांनी आपल्या जबाबात केला आहे. आधीच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असणारे अपहरणकर्ते भरत घरत व त्यांचे साथीदार यांनी संतोष शेडगे यांना बेदम मारहाण केली व हत्याराचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी देखील दिली असल्याची तक्रारीमध्ये म्हटले आहे.

या प्रकरणी संतोष शेडगे यांनी भरत घरत व अन्य अनोळखी इसमांविरोधात अपहरण, मारहाण, धमकी, जबरदस्तीने तडजोडनामा लिहून घेणे अशा गंभीर गुह्यांची तक्रार पाचगणी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. दरम्यान, या अपहरण आणि धमकी प्रकरणात या प्रकरणातील मुख्य आरोपी असणाऱ्या भरत घरत याच्याच भावकीतील एक मोठा राजकीय पुढारी यामध्ये सामील असल्याचा देखील संतोष शेडगे यांनी सांगितले. त्याच्यावर देखील चौकशी करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी देखील केली आहे.

साताऱ्यासह महाबळेश्वर, पाचगणीमध्ये संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. याचा तातडीने शोध लावावा आणि संबंधित आरोपींना लवकर गजाआड करावे अशी मागणी आरपीआय एक गटाचे पश्चिम महाराष्ट्राचे वाहतूक आघाडी अध्यक्ष संग्राम दादा रोकडे यांनी केली आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article