कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Solapur News : अबब... गांधी जंयती सप्ताहात 90 लाखाची दारू जप्त

04:25 PM Oct 10, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

      सोलापूरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई 90 लाखांचा मुद्देमाल जप्त

Advertisement

सोलापूर : सोलापूर महात्मा गांधी जयंती सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली. अवैध देशी, विदेशी मद्य व हातभट्टी निर्मिती वाहतुकीवर केलेल्या कारवाईत २८ वाहनांसह ९० लाख ९७ हजार ७७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Advertisement

२ ते ८ ऑक्टोबर या दरम्यान महात्मा गांधी सप्ताहात एकूण १४३ गुन्हे नोंद करण्यात आले. यात १२६ जणांवर कारवाई करून ७३ हजार ४९५ लिटर गूळ मिश्रीत रसायन तसेच ६ हजार ५१५ लिटर हातभट्टी दारू, १५२.३७ लिटर विदेशी मद्य तसेच ३१४.८२ लिटर देशी मद्य, ३१.२ लिटर बिअर, ४८७ लिटर ताडी, ७५० किलो काळा गुळ, ९०.५४ लिटर पर राज्यातील विदेशी मद्य असा एकूण २८ वाहनांसह ९० लाख ९७ हजार ७७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यावेळी गतवर्षीच्या तुलनेत २०२५-२६ या वर्षात एकूण गुन्ह्यामध्ये १५ टक्के व एकूण मुद्देमालात २३२ टक्के वाढ झाली.ही कारवाई निरीक्षक आर.एम. चवरे, . व्ही. घाटगे, पंकज कुंभार, राकेश पवार, दुय्यम निरीक्षक एस. डी. कांबळे, आर. एम. कोलते, धनाजी पोवार, समाधान शेळके, सुखदेव सिद, अंजली सरवदे, प्रीतम पडवळ, राम निंबाळकर, श्रद्धा गडदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, गुरुदत्त भंडारी, आनंद जोशी आदींनी केली.

Advertisement
Tags :
@solapurnews#Maharastra#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediamaharastrasolapur
Next Article