महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंचवाडी येथे पडिक शेतजमिनी पुन्हा लागवडीखाली

11:43 AM Dec 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शिरोडा : पंचवाडी शिरोडा येथील अमळाय आड येथील सुमारे पंधरा वर्षे पडीक असलेल्या भात शेत जमिनी स्थानिक शेतकरी आनंद नागू गावकर यांच्या नेतृत्वाखाली लागवडीखाली आणण्यात आल्या. गेली कित्येक वर्षे पडीक असलेली जमीन सुमारे 30 शेतकऱ्यांच्या सहकार्याने लागवडीत आणण्यात आले असल्याचे आनंद गावकर यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षे गावातील पडीक असलेल्या शेतजमिनी यंदा शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन लागवडीखाली आणण्याचा निर्णय घेतला. शेत जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी लागणारे बियाणे, कामगारांचा खर्च तथा यंत्रणा जलस्रोतमंत्री तथा आमदार सुभाष शिरोडकर यांनी पुरविले. भातशेती कापणी व शेतकऱ्यांमध्ये पिकाची वाटणी करण्याच्या कार्यक्रमात स्थानिक आमदार सुभाष शिरोडकर, पंचसदस्य लीबी कोस्ता, पंचसदस्य व माजी सरपंच ख्रिस्तेव डिकॉस्ता व शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतजमिनी पिकवण्याचा शेतकऱ्यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मंत्री शिरोडकर यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच अन्य भागातील शेतकऱ्यांनीही जमिनी लागवडीखाली आणाव्यात असे आवाहन त्यांनी यावळी केले. कार्यक्रमानंतर सर्व शेतकऱ्यांना पिकवलेल्या पिकाची समान वाटणी करण्यात आली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article