For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

अयोध्येत जाण्यासाठी कोंकण रेल्वे मार्गावरून सुटणार विशेष 'आस्था' रेल्वे गाडी

04:36 PM Jan 25, 2024 IST | Abhijeet Khandekar
अयोध्येत जाण्यासाठी कोंकण रेल्वे मार्गावरून सुटणार विशेष  आस्था  रेल्वे गाडी
Aastha train depart

फेब्रुवारीपासून वास्को वरुन कोकण रेल्वेमार्गावर अयोध्येला जाण्यासाठी आय.आर.सी.टि.सी. कडून दोन वेळा विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. ही ट्रेन कोकणातील स्थानकांवर थांबणार असून १२ फेब्रुवारीला या गाडीची पहिली ट्रिप असणार आहे.

Advertisement

या गाडीच बुकिंग हे फक्त आय.आर.सी.टि. सी. च्या माध्यमातून केल जाणार आहे. देशभरातून 66 स्थानकांवरून अशा ट्रेन सुटणार आहेत. याच बुकिंग राउंड ट्रिप मधे केल जाणार आहे. लवकरच IRCTC च्या वेबसाईटवर हे बुकिंग उपलब्ध होईल. जे रामभक्त अयोध्येत जाऊ इच्छितात त्यांनी या आस्था ट्रेनचा लाभ घ्यावा असं आवाहन कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर यांनी केल आहे. त्यांनी नुकतीच कोकण रेल्वेमार्गावरुन अयोध्ये साठी ट्रेन सोडण्याची मागणी केली होती. ही विशेष ट्रेन कोकण रेल्वेमार्गावरुन सोडल्याबद्दल त्यांनी IRCTC तसेच रेल्वे मंत्रालयाच्या कार्यवाही विषयी समाधान व्यक्त केले.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.