महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वास्को-अयोध्या मार्गावर ‘आस्था स्पेशल एक्प्रेस’

12:21 PM Jan 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : तमाम देशवासियांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन होऊन मंदिर दर्शनासाठी खुले झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता दक्षिण-पश्चिम रेल्वेने गोव्यातून अयोध्येला जाण्यासाठी खास रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली आहे. ‘आस्था स्पेशल एक्स्प्रेस’ या ट्रेनद्वारे गोव्याला अयोध्या धामशी जोडण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. त्याद्वारे ट्रेन क्रमांक 06205 ही वास्को ते अयोध्येत ‘दर्शन नगर’ या मार्गावर प्रवास करणार आहे. सोमवार दि. 12 फेब्रुवारी रोजी वास्को येथून सुटेल व दि. 16 फेब्रुवारी दर्शननगर येथून गोव्यात येण्यासाठी निघेल. त्यानंतर पुन्हा दि. 26 रोजी अयोध्येकडे प्रस्थान करेल व तेथून दि. 1 मार्च रोजी गोव्याच्या परतीच्या प्रवासाला लागणार आहे. तब्बल 22 कोच असलेली ही ट्रेन सुमारे 2,791 किमीचा एकेरी प्रवास करेल. या दरम्यान ती माजोर्डा, मडगाव, करमळी, रत्नागिरी, पनवेल, वापी, कोटा, तुंडला, प्रयागराज, मिर्झापूर या भागातून जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article