लोकमान्य सोसायटी, ‘तरूण भारत संवाद’तर्फे आरती स्पर्धा
31 ऑगस्ट राजापूर, 3 सप्टेंबर रत्नागिरी, 4 सप्टेंबर रोजी लांजात आयोजन; स्पर्धकांना सहभागासाठी आवाहन
रत्नागिरी प्रतिनिधी
लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी, आणि ‘तरूण भारत संवाद’ रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर, रत्नागिरी, लांजा येथे आरती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा राजापूर 31 ऑगस्ट, रत्नागिरी 3 सप्टेंबर तर लांजा येथे 4 सप्टेंबर रोजी होणार आहे. तिन्ही तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये पहिल्या 10 संघांना संधी देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 5, 000 ऊपये, द्वितीय क्रमांकास 3,000 ऊपये तर तृतीय क्रमांकास 2,000 ऊपये असे स्वरूप असणार आहे. स्पर्धेत सहभागी होणारा संघ त्या- त्या तालुक्यातील असावा. यामध्ये पुरूष आणि महिला संघाचा सहभाग असेल. स्पर्धेत सादर करण्यात येणारी आरती स्वरचित किंवा पारंपरिक असली तरी चालेल. आरती मराठीत असावी. सादरीकरणाची वेळ जास्तीत- जास्त 15 मिनिटे असेल. या वेळेमध्ये कितीही आरती सादर करता येतील. स्पर्धकांनी त्यांना आवश्यक असणारी पारंपरिक वाद्ये (तबला, पखवाज, टाळ, झांज, हार्मोनियम, ऑर्गन) स्वत: आणावयाची आहेत. पार्श्वसंगीतासाठी इलेक्ट्रॉनिक तानपुरा वगळता इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा वापर करता येणार नाही. एका संघामध्ये जास्तीत-जास्त 11 जणांचा समावेश असावा (वादकांसहीत). आरती सादरीकरण सांघिक असावे. परीक्षणाच्या वेळी स्वर, ताल, शब्दोच्चार, आरतीची निवड, सांघिक सादरीकरण या गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या जातील. स्पर्धकांचा पोषाख पारंपरिक असावा. प्रथम नोंदणी करणाऱ्या 10 संघांना स्पर्धेत भाग घेता येईल. स्पर्धेपूर्वी संघांनी सादर करणाऱ्या आरत्या लिखित स्वरूपात आयोजकांकडे द्याव्यात. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच परीक्षकांचा निर्णय अंतिम मानला जाईल. या स्पर्धेसंदर्भात अंतिम निर्णयाचे सर्व अधिकार ‘तरूण भारत संवाद’ व्यवस्थापकांकडे राखून ठेवण्यात आले आहेत. इच्छुक स्पर्धकांनी आपल्या संघाची नोंदणी 28 ऑगस्टपर्यंत तऊण भारत कार्यालय, पारस प्लाझा, सी विंग, 2 रा मजला, के. सी. जैननगर, रत्नागिरी येथे करावी. अधिक माहितीसाठी 02352-224657, 270257 मोबा. 9112157777 / 9422413712 येथे संपर्क साधावा, असे आवाहन लोकमान्य सोसायटी, ‘तरूण भारत भारत’तर्फे करण्यात आले आहे.
स्पर्धेतील नावनोंदणीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा:
राजापूर: तरूण भारत कार्यालय, भटाळी, राजापूर संपर्क : प्रकाश नाचणेकर (मोबा. 9226134940), संतोष शिंदे (मोबा. 8766560511) स्पर्धा: 31 ऑगस्ट 2024, सकाळी 9.30 वाजता, स्थळ: राजापूर नगर वाचनालय सभागृह, राजापूर.
रत्नागिरी: तरूण भारत कार्यालय, पारस प्लाझा, के. सी. जैननगर, माऊती मंदिर, रत्नागिरी (02352-270257/224657, मोबा. 9112157777, 9422413712) स्पर्धा: 3 सप्टेंबर 2024, सकाळी 9.30 वाजता, स्थळ: गजानन महाराज मंदिर, पॉवर हाऊस, नाचणे रोड, रत्नागिरी.
लांजा: लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी, लांजा, एसटी स्टॅण्डच्या बाजूला लांजा (नसिर मुजावर, तऊण भारत प्रतिनिधी, मोबा. 8637702626) स्पर्धा: 4 सटेंबर 2024, सकाळी 9.30 वाजता, स्थळ: श्री धनी केदारलिंग मंदिर, लांजा.