For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीत ‘आप’चे प्रदेश उपाध्यक्ष भाजपात

06:34 AM Nov 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीत ‘आप’चे प्रदेश उपाध्यक्ष भाजपात
Advertisement

अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोपास्त्र

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीत आम आदमी पक्षाला (आप) मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे दिल्ली उपाध्यक्ष, राष्ट्रीय प्रवक्ते आणि विधानसभेच्या याचिका आणि अंदाज समितीचे माजी अध्यक्ष राजेश गुप्ता भाजपमध्ये सामील झाले आहेत. ‘आप’चे कर्नाटक प्रभारी असलेले गुप्ता यांनी भाजप मुख्यालयात औपचारिकपणे भाजपात प्रवेश केला.  भाजप मुख्यालयात दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि वैजयंत पांडा यांनी त्यांचे पक्षात स्वागत करताना आपची ‘आपत्ती’ आता भाजपची ताकद बनेल, असे म्हटले आहे.

Advertisement

2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ‘आप’ नेत्यांच्या सोडचिठ्ठी मालिकेचा हा भाग असल्याचे दिसून येते. भाजपमध्ये सामील झाल्यानंतर गुप्ता यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोपास्त्र डागले. आप पक्षा आता मूळ विचारसरणीपासून दूर जात असून भ्रष्टाचारात बुडाल्याचा दावा त्यांनी केला. तसेच आता केजरीवाल आपला फोनही उचलत नसल्याचे सांगत त्यांनी ‘आपबीती’ मांडली. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू भरून आले होते. याप्रसंगी त्यांनी आता आपण भाजपसोबत विकास आणि राष्ट्रवादाच्या मार्गावर चालणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.