महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्वाती मालिवाल यांना राज्यसभेवर पाठविणार आप

06:21 AM Jan 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संजय सिंह यांना भरता येणार उमेदवारी अर्ज

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

आम आदमी पक्षाने दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मालिवाल या पहिल्यांदाच खासदार होणार आहेत. याचबरोबर ‘आप’ने वर्तमान खासदार एन.डी. गुप्ता यांना पुन्हा राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. संजय सिंह यांना पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी पक्षाने दिली आहे. आम आदमी पक्षाच्या राजकीय विषयक समितीने या निर्णयांना मंजुरी दिली आहे. संजय सिंह हे सध्या दिल्ली अबकारी घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत.

दिल्लीत राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होणार आहे. या तिन्ही जागा आम आदमी पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या 70 पैकी 62 आमदार हे आम आदमी पक्षाचेच आहेत. तर भाजपचे 8 आमदार आहेत. मोठ्या बहुमतामुळे राज्यसभेच्या तिन्ही जागांवर आप उमेदवार विजयी होऊ शकतात. ही निवडणूक 19 जानेवारी रोजी होणार असून त्याचदिवशी याचा निकाल जाहीर होणार आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. तिन्ही जागांसाठी 9 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. तर 10 जानेवारीला अर्जांची छाननी केली जाणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत 12 जानेवारी निश्चित करण्यात आली आहे.

दिल्लीच्या न्यायालयाने तुरुंगात कैद आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिशंह यांना राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज अन् दस्तऐवजांवर स्वाक्षरी करण्याची अनुमती दिली आहे. राज्यसभा सदस्य म्हणून संजय सिंह यांचा वर्तमान कार्यकाळ 27 जानेवारी रोजी संपुष्टात येत आहे.

संजय सिंह यांच्यासोबत दिल्लीतून सुशील कुमार गुप्ता आणि नारायण दास गुप्ता हे सध्या राज्यसभा खासदार आहेत. यातील नारायण दास गुप्ता आणि संजय सिंह यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article