महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आप’लाच नको होती आघाडी : हुड्डा

06:38 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काँग्रेसकडून गंभीर प्रयत्न :

Advertisement

वृत्तसंस्था/ रोहतक

Advertisement

हरियाणातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी आम आदमी पक्षासोबतच्या आघाडीवरून वक्तव्य केले आहे. आम्ही ‘आप’सोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला, परंतु आम आदमी पक्षानेच स्वत:चे उमेदवार घोषित केले. आम्ही गंभीरपणे प्रयत्न केला, परंतु आम आदमी पक्षालाच आघाडी नको होती असा दावा हुड्डा यांनी केला आहे.

आमची प्राथमिकता नेहमीच जनतेची सेवा राहिली आहे. लोक आम्हाला आशीर्वाद देतात आणि त्यांची सेवा करणे आमचे कर्तव्य आहे. जनसेवेच्या भावनेपोटीच मी आणि माझे कुटुंब राजकारणात सहभागी झाले आहे. लोकांनी संधी दिल्याने शक्य तितकी मी त्यांची सेवा करणार असल्याचे उद्गार हुड्डा यांनी काढले आहेत.

हरियाणाच्या 36 समुदायांनी यावेळी काँग्रेसला समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. अबकी बार काँग्रेस की सरकार असा निर्धार या समुदायांनी केला आहे. भाजप सत्तेवरून जात असून काँग्रेस सत्तेवर येत असल्याचा दावा हुड्डा यांनी केला.

हरियाणात भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या नेतृत्वत काँग्रेस बहुमताने सरकार स्थापन करणरा आहे. आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच हरियाणात काँग्रेसच्या बाजूने वातावरण आहे. भारत सरकारच्या आकडेवारीनुसार बेरोजगारी आणि गुन्ह्यांच्या प्रमाणात हरियाणा देशात पहिल्या क्रमांकावर आहे. काँग्रेस राज्यात बदल घडवून आणणर आहे. भाजप नेतृत्वाने हरियाणात स्वत:ची सत्ता वाचविण्याचा जोरदार प्रयत्न चालविला आहे, परंतु राज्याची जनता येथील सरकार बदलणार असल्याचा दावा रोहतकचे खासदार दीपेंद्र सिंह हु•ा यांनी केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article