Ratnagiri News: कामगाराचा खून करून आंबा घाटात दिले फेकून
जबर मारहाणीत झाला अन्य एका कामगाराचा मृत्यू
रत्नागिरी: शहरालगतच्या मिरजोळे येथील तऊणीचा खून करणारा संशयित दुर्वास पाटील हा सिरीयल किलर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आह़े. दुर्वास याने प्रेयसी भक्ती मयेकर हिच्या खुनाअगोदर बारमधील दोन कामगारांचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
यापैकी राकेश अशोक जंगम (28, ऱा वाटद खंडाळा, रत्नागिरी) याचा कारमध्येच गळा आवळून त्याचा मृतदेह अन्य साथीदारांच्या मदतीने आंबा घाटात फेकून दिला. तर दुर्वासने केलेल्या जबर मारहाणीत सीताराम वीर (50, ऱा कळझोंडी, रत्नागिरी) याचा मृत्यू झाल्याची आणखी एक बाब पोलीस तपासात उघड झाली आहे.
दरम्यान, राकेश याच्या खूनप्रकरणी दुर्वास याचा साथीदार असलेल्या नीलेश रमेश भिंगर्डे (35, ऱा इस्लामपूर जि. सांगली) याला पोलिसांनी सांगली येथून अटक केल़ी. सोमवारी त्याला न्यायालयापुढे हजर केले असता 8 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आह़े.
दुर्वास दर्शन पाटील (28, ऱा वाटद खंडाळा), विश्वास विजय पवार (41, ऱा कळझोंडी बौद्धवाडी रत्नागिरी) व तिसरा संशयित नीलेश भिंगर्डे या तिघांनी राकेश जंगम याचा गळा आवळून खून केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आह़े
राकेशच्या खूनासाठी कोल्हापूरला जायचा केला बहाणा
राकेश हा दुर्वासच्या खंडाळा येथील सायली बारमध्ये कामाला होत़ा काही कारणावरून राकेश व दुर्वास यांच्यात वाद झाला होत़ा या वादातून राकेशचा काटा काढायचा असा कट दुर्वासने रचल़ा त्यासाठी त्याने बारमधील कामगार विश्वास पवार व नीलेश भिंगर्डे यांना सोबत घेतल़े, राकेश याचा खून करण्याचा निर्धार केल्यानंतर दुर्वासने त्याला आपल्याला कोल्हापूर येथे जायचे असल्याचे सांगितल़े, त्यानुसार राकेश हा कोल्हापूर येथे जाण्यास तयार झाल़ा दुर्वास याने आपण कोल्हापूर येथे जायचे असल्याचे सांगितल्यानंतर राकेश हा आपल्या घरी गेल़ा 6 जून 2024 रोजी राकेश याने आपण कपड्यांची बॅग आणण्यासाठी बाहेर जात असल्याचे आईला सांगितले होत़े त्यानंतर तो पुन्हा घरी परतला नाह़ी.
कारमध्ये राकेशचा गळा आवळला
राकेश याचा काटा काढायच्या कटाची माहिती दुर्वास याने त्याच्या अन्य दोन साथीदारांना दिली होत़ी 6 जून 2024 रोजी कारमधून दुर्वास, विश्वास पवार, नीलेश भिंगर्डे हे कोल्हापूरच्या दिशेने निघाल़े कार कोल्हापूरकडे जात असताना रात्रीच्यावेळी दुर्वास व त्याच्या दोन साथीदारांनी राकेश याचा गळा आवळून खून केल़ा, त्यानंतर राकेशचा मृतदेह आंबा घाटातून खाली फेकून दिल़ा अशी कबुली दुर्वास याने पोलिसांजवळ दिली आह़े
वर्षभरापूर्वीच आईने दिली होती बेपत्ताची तक्रार
कपड्यांची बॅग आणण्यासाठी जातो असे सांगून 6 जून 2024 रोजी घरातून बाहेर पडलेला राकेश हा घरी परतला नव्हत़ा त्यामुळे त्याचे आई-वडील चिंतेत पडले होत़े बरेच दिवस राकेश याचा कोणताही थांगपत्ता लागत नसल्याने अखेर राकेशच्या आईने 21 जून 2024 रोजी जयगड पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होत़ी, मात्र वर्षभरात पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात राकेश याच्याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती मिळाली नाह़ी.
सांगली येथून नीलेश भिंगर्डेला अटक
राकेश जंगम याच्या खूनप्रकरणी जयगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांकडून तिसरा आरोपी नीलेश याचा शोध घेण्यास सुऊवात केल़ी नीलेश हा सांगली येथे असल्याचे निष्पन्न झाल़े, त्यानुसार 31 ऑगस्ट रोजी जयगड पोलिसांचे पथक सांगली येथे रवाना झाल़े यावेळी हनुमाननगर वॉर्ड नंबर 6, इस्लामपूर त़ा वळवा जि. सांगली येथील राहत्या घरातून नीलेश याला पोलिसांनी ताब्यात घेतल़े.
सिरियल किलर दुर्वासच्या खुलाशाने पोलीसही चक्रावले
भक्ती मयेकर हिच्या खूनप्रकरणी दुर्वास व त्याच्या तीन साथीदारांना अटक केल्यानंतर खंडाळा येथून बेपत्ता झालेल्या दोघा कामगारांबाबत पोलिसांकडून कसून तपास करण्यात आल़ा यावेळी दुर्वास याने विश्वास पवार, सांगली येथील नीलेश भिंगर्डे याच्या मदतीने राकेशचा खून केल्याची माहिती उघड केल़ी.
भक्ती मयेकर हिच्या खून प्रकरणानंतर दुर्वास याने सिताराम वीर व राकेश जंगम यांचा खून केल्याची कबुली पोलिसांजवळ दिली आह़े त्यानुसार दुर्वास याच्यावर एकूण तीन खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला आह़े एक-दोन नव्हे तर तब्बल तीन खून केल्याचे समोर येताच पोलीसही चक्रावून गेले आहेत.
मारहाणीत सिताराम वीर याचा मृत्यू
सीताराम वीर हा दुर्वासच्या सायली बारमध्ये कामाला होत़ा 2024 मध्ये दुर्वास याने काही वादातून सिताराम वीर याला गंभीर स्वऊपाची मारहाण केली होत़ी या मारहाणीत सीतारामचा मृत्यू झाला होत़ा, तेव्हा याप्रकरणी नातेवाईक व अन्य कुणीही दुर्वास याच्याविऊद्ध तक्रार दाखल केली नसल्याचे सांगण्यात येत आह़े.
आंबा घाटात शोधमोहीमेत 200 पोलीस
6 जून 2024 रोजी राकेशचा मृतदेह दुर्वास व त्याच्या साथीदारांनी आंबा घाटातून फेकून दिला होत़ा या घटनेला आता वर्ष उलटले असले तरी पोलिसांकडून मृतदेहांचे अवशेष मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आह़े. सोमवारी 200 हून अधिक पोलिसांच्या मदतीने आंबा घाटात मृतदेहबाबत काही मिळते का याचा शोध पोलिसांकडून घेण्यात आल़ा मात्र पोलिसांच्या हाती काही लागले नाह़ी.
पोलीस अधीक्षकांनी बेपत्तांची यादी मागवली
दुर्वास याने एकूण तीन खून केल्याचे उघड झाल्यानंतर पोलीसदेखील चक्रावून गेले आहेत़ याप्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घेतली आह़े. जयगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून बेपत्ता झालेल्यांची यादी मागवली आह़े अन्य व्यक्तींच्या बेपत्ता होण्यामागे दुर्वास व त्याच्या साथीदारांचा सहभाग आहे का याबाबत पोलिसांकडून तपासणी केली जाणार आह़े
मृतदेहाच्या अवशेषांसाठी शर्थीचे प्रयत्न - ब़ी बी महामुनी
राकेश जंगम याचा मृतदेह 6 जून 2024 रोजीआंबा घाटातून खाली फेकून देण्यात आला होत़ा आता या प्रकाराला वर्ष उलटून गेले असले तरी पोलिसांकडून याप्रकरणी मृतदेहाचे अवशेष मिळविण्यासाठी कसून शोध घेतला जात आह़े आंबा घाटाचा परिसर जंगलमय असल्याने याठिकाणी असलेले वन्य प्राणी, घाटात रस्त्याचे सुऊ असलेले काम यामुळे अवशेष मिळविणे अवघड ठरत आह़े तरीदेखील पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत़, असे अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सांगितले.
बस वाहकावर बंदूक रोखल्याची चर्चा
दुर्वास याचा खंडाळा बाजारपेठेत सायली बार असून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर पैसा आला होत़ा या जोरावर तो आपल्या साथीदारांच्या मदतीने खंडाळा परिसरात दमदाटी व दहशत माजवत होत़ा काही दिवसांपूर्वी दुर्वासने एसटी बसवाहकाशी झालेल्या वादातून बस वाहकावर बंदूक रोखल्याची चर्चा परिसरात होत़ी मात्र याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाह़ी