महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हरियाणात आम आदमी पक्ष स्वबळावर

07:00 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /चंदीगड

Advertisement

हरियाणामध्ये येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. अशास्थितीत सर्वच राजकीय पक्षांनी स्वत:ची तयारी सुरू केली आहे. याचदरम्यान आम आदमी पक्षाने हरियाणात विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. हरियाणात आम आदमी पक्ष कुठल्याही पक्षासोबत आघाडी करणार नाही. आप स्वबळावर राज्यातील सर्व जागा लढविणार अशी घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुरुवारी केली आहे. आम आदमी पक्ष एका दशकाच्या आत राष्ट्रीय पक्ष ठरला आहे. आम्ही दोन राज्यांमध्ये (दिल्ली आणि पंजाब) सरकार चालवत आहोत. आम्ही हरियाणा विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु याकरता आम्ही कुठल्याही पक्षासोबत आघाडी करणार नाही. हरियाणा या राज्याने सर्व राजकीय पक्षांना संधी दिली, परंतु कुठलाच पक्ष येथील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेला नाही. अरविंद केजरीवाल हे मूळचे हरियाणाचे आहेत,

Advertisement

अशास्थितीत हरियाणाच्या लोकांना आम आदमी पक्षाकडून मोठ्या अपेक्षा असल्याचा दावा भगवंत मान यांनी केला आहे. हरियाणा विधानसभा निवडणूक आम्ही पूर्ण शक्तिनिशी लढविणार आहोत. पंजाब आणि दिल्लीत आमचे सरकार आहे, अशास्थितीत हरियाणात आम आदमी पक्ष का नाही अशी विचारणा लोकांनी आमच्याकडे केली होती असा दावा मान यांनी केला आहे. या पत्रकार परिषदेला भगवंत मान यांच्यासोबत आप खासदार संजय सिंह आणि हरियाणा आप प्रभारी संदीप पाठक उपस्थित होते. पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये अनेक समानता आहेत. हरियाणातील निम्मी जनता पंजाबी भाषिक आहे असे मान यांनी म्हटले आहे. आम आदमी पक्ष 20 जुलै रोजी हरियाणासाठी ‘केजरीवालांची गॅरंटी’ जारी करणार आहे. त्यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल उपस्थित राहणार आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article