महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिल्लीत आम आदमी पक्ष स्वबळावर

06:34 AM Oct 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काँग्रेससोबत करणार नाही आघाडी : हरियाणा निवडणूक निकालाची पार्श्वभूमी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

हरियाणातील पराभवानंत काँग्रेसवर त्याचेच सहकारी पक्ष टीका करू लागले आहेत. याचदरम्यान इंडिया आघाडीत सामील आम आदमी पक्षाने आगामी दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे बुधवारी स्पष्ट केले आहे. आम आदमी पक्ष दिल्ली निवडणुकीकरता काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचे आपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका कक्कड यांनी सांगितले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक आम्ही स्वबळावर लढविणार आहोत. एकीकडे अति आत्मविश्वासी काँग्रेस आहे आणि दुसरीकडे अहंकारी भारतीय जनता पक्ष आहे. आम्ही आमचे शीर झुकवून राहू आणि मागील 10 वर्षांमध्ये केलेले कामच मांडू. आम्ही कठोर मेहनत करू असे कक्कड यांनी म्हटले आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक पुढील वर्षाच्या प्रारंभी होण्याची अपेक्षा आहे. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 70 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या आणि भाजपला 8 जागा मिळाल्या होत्या.

आप आणि काँग्रेस मिळून दिल्ली विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची शक्यता कक्कड यांनी फेटाळून लावली आहे. यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला आता आप तसेच भाजपचे तगडे आव्हान पेलावे लागणार आहे. आम आदमी पक्षाची ही घोषणा काँग्रेससाठी मोठा झटका आहे, कारण 2013 पासून काँग्रेसचा कुठलाही नेता दिल्ली विधानसभेत पोहोचलेला नाही.

हरियाणा निवडणुकीवरून काँग्रेस आणि आप यांच्यात आघाडीसंबंधी चर्चा झाली होती. परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नव्हते. जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाली नव्हती. आप आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाली असती तर हरियाणाचा निकाल कदाचित वेगळा लागण्याची शक्यता होती. आम आदमी पक्षाच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला असला तरीही पक्षाने एक टक्क्याच्या आसपास मते मिळविली आहेत.

हरियाणाच्या निवडणूक निकालांनी मिळालेला सर्वात मोठा धडा म्हणजे कधीच अति आत्मविश्वासी असू नये. दिल्ली विधानसभा निवडणूक नजीक आली असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. प्रत्येक निवडणूक, प्रत्येक मतदारसंघ हा जिंकण्यासाठी अवघडच असतो असे उद्गार आप संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी काढले होते.

व्यूहनीति बदलणार आप

हरियाणाच्या निकालानंतर आम आदमी पक्ष दिल्लीत स्वत:च्या निवडणूक व्यूहनीतित बदल करणार असल्याचे मानले जात आहे. ज्या भागांमध्ये आम आदमी पक्षाच्या मतपेढीला सुरुंग लावण्याचा भाजप प्रयत्न करत आहे, तेथे पक्ष काही विशेष अभियान सुरू करू शकतो. याचबरोबर उमेदवारांच्या निवडीत पक्ष यावेळी अधिक सतर्कता बाळगणर आहे. मुस्लीमबहुल भागात पूर्वीच्या तुलनेत मते मिळण्याचे प्रमाण कमी होण्याची भीती पक्षाला आहे.

डायनासोर परततील, पण काँग्रेस नाही

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी हरियाणा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवानंतर उपरोधिक वक्तव्य केले आहे. उर्वरित पक्ष खूपच पुढे निघून गेले आहेत, परंतु काँग्रेस पक्ष आजही परिवाराबाहेर पडू शकत नाही. डायनासोर परतू शकतात, परंतु काँग्रेस पक्ष सत्तेवर अजिबात परतू शकत नाही असे बिट्टू यांनी म्हटले आहे.  बिट्टू हे गांधी परिवार आणि खासकरून राहुल गांधी यांचे कडवे टीकाकार राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी बिट्टू यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरीही पंतप्रधान मोदींनी बिट्टू यांना स्वत:च्या मंत्रिमंडळात स्थान दिले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article