महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आम आदमी पक्षाला दिल्लीत कार्यालयासाठी मिळाली जागा

07:00 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकारने आम आदमी पक्षाला नवी जागा उपलब्ध करून दिली आहे. आम आदमी पक्षानुसार नवी दिल्लीच्या लुटियन्स भागात पंडित रविशंकर शुक्ला मार्गावरील बंगला क्रमांक 1 आता पक्षाचे नवे मुख्यालय असणार आहे. ‘आप’चे कार्यालय यापूर्वी राउज अॅव्हेन्यू न्यायालय परिसरात होते. दिल्ली उच्च न्यायालयाने राष्ट्रीय पक्ष असल्याने आम आदमी पक्षाला जागा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला गुरुवारपर्यंतची मुदत दिली होती. जून महिन्यात उच्च न्यायालयाने ‘आप’ला स्वत:च्या कार्यालयाच्या निर्मितीसाठी स्थायी भूखंड वाटप केले जात नाही तोवर नागरी इमारतीचा वापर करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले होते.  तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम आदमी पक्षाला 15 जूनपर्यंत स्वत:चे कार्यालय रिकामी करायचे हेते. आप कार्यालय दिल्ली उच्च न्यायालयाच्या विस्तारासाठी राखीव भूखंडावर असल्याने सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला होता. यावर आपच्या वतीने वरिष्ठ वकील राहुल मेहरा यांनी एक राष्ट्रीय पक्ष म्हणून स्थायी कार्यालयासाठी भूखंड मिळत नाही तोवर तात्पुरत्या कार्यालयाचा अधिकार असल्याचा युक्तिवाद उच्च न्यायालयासमोर केला होता.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article