महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आबा स्पोर्ट्स क्लबला सर्वसाधारण विजेतेपद

10:00 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पहिली पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धा

Advertisement

बेळगाव : पहिल्या पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धेत चुरशीच्या लढतीमध्ये बेळगाव आबा स्पोर्ट्स क्लबने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. तर स्विमर्स क्लबला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धा मुले व मुली अशा एकूण सहा गटात घेण्यात आल्या. प्रत्येक गटातील वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळवलेल्या जलतरणपटूना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.  वैयक्तिक विजेतेपद मुलींचा खुलागट- नंदिनी पेटकर 26 गुण (बीएससी पुणे), गट क्रमांक 1: वेदा खानोलकर 35 गुण (आबा स्पोर्ट्स क्लब बेळगाव), गट क्रमांक 2 समृद्धी हलकारे 35 गुण ( स्विमर्स क्लब बेळगाव), गट क्रमांक 3 दिशा होंडी 35 गुण (आबा क्लब बेळगाव), गट क्रमांक 4 निधी मुचंडी 35 गुण (आबा स्पोर्ट्स क्लब बेळगाव) गट क्रमांक 5  अहाना घोष  28 गुण (डेक्कन जिमखाना पुणे) यांनी वैयक्तीक विजेतेपद पडकाविले. मुले खुला गट- सिद्धांत सडेकर 26 गुण (स्विमर्स क्लब बेळगाव), गट क्रमांक 1 स्वरूप धनुचे 32 गुण (आबा स्पोर्ट्स क्लब बेळगाव), गट क्रमांक 2 अर्जुन नाईक 35 गुण (बीएससी पुणे), गट क्रमांक 3 अद्वैत दळवी 33 गुण (खेलो इंडिया गोवा), गट क्रमांक 4 कुशल गौडा 31 गुण (पीईटी मंड्या), गट क्रमांक 5 शिवांशू खोराटे (डेक्कन जिमखाना पुणे),  यांनी वैयक्तीक विजेतेपद पटकाविले.

Advertisement

बक्षिस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून हिंद सोशल अँड स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अरविंद संगोळी, सी.ए. राजेंद्र मुंदडा, वाणी जोशी, तसेच आबा क्लबचे अध्यक्ष शितल हुलबत्ते उपस्थित होते. विश्वास पवार यांनी पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या जलतरणपटूंना प्रमाणपत्र, पदक व चषक देऊन गौरविण्यात आले.  या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमित जाधव,  संदीप मोहिते, रणजीत पाटील, अॅड. संतोष गडकरी, सुनील हनम्मण्णवर, राजू गडकरी, सुनील जाधव, वैभव खानोलकर, सतीश धनुचे, राजेश होंडी, हरीश मुचंडी, शशिकांत चित्रगार, शुभांगी मंगळूरकर, विजया शिरसाठ, ज्योती पवार, शितल जाधव, राजश्री पाटील, प्रसन्ना बसुर्तेकर, स्नेहल धामणकर, गौरी जुवळी, रोटी, स्वाती जाधव, ऋतुजा पवार, मारुती घाडी, प्रसाद हुली, शिवराज मोहिते, डॉ. सुधीर जोशी, संजय मरगाळे, चंद्रकांत बेळगोजी, कौस्तुभ पोटे, विशाल वेसणे, कलाप्पा पाटील, विजय नाईक, विजय भोगण, किशोर पाटील, प्रसाद दरवंदर, निखिल भेकणे, अशुतोष बेळगोजी, भरत पाटील, प्रांजल सुळदाळ, ऋषिकेश जाधव  रमेश कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article