कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आबा हिंदला सर्वसाधारण विजेतेपद

11:09 AM Aug 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : इचलकरंजी येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र अॅमेचर असोसिएशन व सोशल सर्कल यांच्या संयुक्त विद्यमानाने निमंत्रितांच्या आंतरराज्य जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा हिंद क्लबच्या जलतरणपटूनी उत्कृष्ट कामगिरी करून 48 सुवर्ण 20 रौप्य व 23 कांस्य असे एकूण 91 पदके संपादन करून उत्कृष्ट कामगिरी केली व आबा हिंद क्लबने वीर सावरकर चषकावर आपले नाव कोरले. कुमार तनुज सिंग ग्रुप 2 पाच सुवर्ण, कुमारी तन्वी बर्डे ग्रुप 1 पाच सुवर्ण, कुमारी निधी मुचंडी ग्रुप 5 सहा सुवर्ण एक रौप्य यांनी वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळविली.

Advertisement

इतर जलतरणपटूंची कामगिरी पुढील प्रमाणे-

Advertisement

मुले ग्रुप 3-प्रजित मयेकर चार सुवर्ण दोन रौप्य एक कांस्य, ग्रुप 4- अमोघ रामकृष्ण चार सुवर्ण तीन रौप्य, अर्णव किल्लेकर तीन सुवर्ण दोन रौप्य, एक कांस्य ग्रुप 5- दक्ष जाधव चार सुवर्ण एक कांस्य, वर्धन नाकाडी चार सुवर्ण, चित्रेश पाटील एक सुवर्ण एक रौप्य, ग्रुप 6- अद्वैत जोशी दोन सुवर्ण चार रौप्य, अगस्त्या बागी एक सुवर्ण.मुली गट क्रमांक 2 - कुमारी अवनी शहापूरकर एक सुवर्ण दोन रौप्य, ग्रुप 3 कुमारी अनन्या रामकृष्ण दोन सुवर्ण पाच कांस्य, कुवारी प्रिशा पटेल दोन कांस्य, गट क्रमांक 4- कुमारी कनक हलगेकर एक सुवर्ण एक रौप्य चार कांस्य, अनिका बर्डे तीन कांस्य, ग्रुप 5- ओवी जाधव दोन सुवर्ण दोन कांस्य दोन रौप्य, तन्वी मुचंडी एक सुवर्ण दोन रौप्य एक कांस्य, आस्था काकडे एक सुवर्ण एक रौप्य, ग्रुप 6- कुमारी गनिष्का एलजी एक सुवर्ण एक कांस्य, तनिष्का खन्नूकर एक कांस्य पदक पटकाविले वरील सर्व जलतरणपटूंना आबा हिंद क्लबचे जलतरण प्रशिक्षक श्री विश्वास पवार, अमित जाधव, रणजीत पाटील, सतीश धनुचे, संदीप मोहिते, किशोर पाटील, शिवराज मोहिते, मारुती घाडी, कलाप्पा पाटील, भरत पाटील, विशाल वेसणे, विजय बोगन, विजय नाईक, प्रसाद दरवंदर प्रांजल सुळधाळ, अमित कुडची, ओम घाडी, चंद्रकांत बेळगोजी यांचे बहुमोल मार्गदर्शन तसेच क्लबचे अध्यक्ष श्री शितल हुलबत्ते श्री अरविंद संगोळी श्री राजू मुंदडा सौ शुभांगी मंगळूरकर श्री भरत गडकरी यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article