For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्ग सागरी स्पर्धेत आबा-हिंद क्लबचे यश

10:07 AM Jan 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
सिंधुदुर्ग सागरी स्पर्धेत आबा हिंद क्लबचे यश
Advertisement

स्मरण मंगळूरकरला जलद जलतरणपटूचा बहुमान

Advertisement

बेळगाव : मालवण येथील चिवला बीच येथे सिंधुदुर्ग जलतरण संघटना आयोजित 14 व्या आंतरराज्य खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत आबा क्लबचा स्मरण मंगळूरकर जलद जलतरणपटू तर आदी शिरसाट, हर्षवर्धन कर्लेकर यांनी सुवर्ण पदक पटकावित यश संपादन केले. मालवण येथील चिवला बीच येथे सिंधुदुर्ग जलतरण संघटना आयोजित आबा, हिंद क्लबच्या जलतरणपटुनी या स्पर्धेत भाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली. स्मरण मंगळूरकरने 5 कि. मी. मध्ये सुवर्ण पदकासह जलद जलतरणपटू हा बहुमान संपादन केला. या स्पर्धेत 1500 हून अधिक जलतरणपटूंनी विविध राज्यातून भाग घेतला होता. आदी शिरसाटने 3  कि. मी व  हर्षवर्धन कर्लेकरने 500 मी. यांनी आपल्या गटात प्रथम क्रमांकासह सुवर्णपदके संपादन केली.  भरत पाटीलने 2  कि. मी मध्ये द्वितीय क्रमांक, निधी मुचंडीने 2 कि. मी मध्ये द्वितीय क्रमांक, ओम जुवळी खास गटात तृतीय क्रमांक, अमूल्या केस्तीकरने 1  कि. मी चौथा क्रमांक, कलाप्पा पाटीलने 2  कि. मी पाचवा क्रमांक,  तनुज सिंग व  धनवी बर्डे 5  कि. मी मध्ये सातवा क्रमांक मिळवला. विजेत्या सर्व जलतरणपटूंना सिंधुदुर्ग जलतरण संस्थेतर्फे रोख रक्कम प्रशस्तीपत्र पदके व चषक देऊन सन्मानित केले. जलतरणपटू त्यांना जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, रणजीत पाटील यांचे मार्गदर्शन तर क्लबचे पदाधिकारी अॅड. मोहन सप्रे, अरविंद संगोळी, शितल हुलबत्ते, शुभांगी मंगळूरकर यांचे प्रोत्साहन मिळत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.