कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिल्ली कॅपिटल्सचा 9 गड्यांनी विजय

06:50 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

युपी वॉरियर्सची एकतर्फी हार : लेनिंग, शेफाली वर्मा यांची अर्धशतके

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisement

महिलांच्या दुसऱ्या प्रिमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेतील येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या चौथ्या सामन्यात कर्णधार मेग लेनिंग आणि शेफाली वर्मा यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने युपी वॉरियर्सचा 33 चेंडूत बाकी ठेऊन 9 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्सचा हा पहिला विजय आहे. मंगळवारी आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. 5 धावात 3 गडी बाद करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या मेरिझन कॅपला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून युपी वॉरियर्सला प्रथम फलंदाजी दिली. युपी वॉरियर्सने 20 षटकात 9 बाद 119 धावा जमवित दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 120 धावांचे सोपे आव्हान दिले. दिल्ली कॅपिटल्सने 14.3 षटकात 1 बाद 123 धावा जमवित हा सामना एकतर्फी जिंकला.

युपी वॉरियर्सच्या डावामध्ये श्वेता सेहरावतने 42 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह सर्वाधिक 45, ग्रेस हॅरिसने 18 चेंडूत 2 चौकारांसह 17, कर्णधार हिलीने 15 चेंडूत 2 चौकारांसह 13, किरण नवगिरेने 7 चेंडूत 1 षटकारासह 10, पूनम खेमनारने 2 चौकारांसह 19 धावा जमविल्या. युपी वॉरियर्सला अवांतराच्या रुपात 10 धावा मिळाल्या. त्यांच्या डावामध्ये 2 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. युपी वॉरियर्सने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात 21 धावा जमविताना 3 गडी गमविले. युपी वॉरियर्सचे पहिले अर्धशतक 70 चेंडूत तर शतक 100 चेंडूत नोंदविले गेले. दिल्ली कॅपिटल्सतर्फे राधा यादवने 20 धावात 4, एम. कॅपने 5 धावात 3 तर अरुंधती रे•ाr आणि सदरलँड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्ली कॅपिटल्सच्या डावाला कर्णधार लेनिंग आणि शेफाली वर्मा यांनी दमदार सुरुवात करुन दिली. या जोडीने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 57 धावा झोडपताना अर्धशतकी भागिदारी 34 चेंडूत नोंदविली. दिल्ली कॅपिटल्सचे शतक 71 चेंडूत फलकावर लागले. शेफाली वर्माने 36 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. तर शेफाली आणि लेनिंग यांनी पहिल्या गड्यासाठीची शतकी भागिदारी 71 चेंडूत पूर्ण केली. त्यामध्ये लेनिंगचा वाटा 44 तर शेफालीचा वाटा 55 धावांचा होता. डावातील 15 व्या षटकात दिल्ली कॅपिटल्सची ही जोडी इक्लेस्टोनने फोडली. तिच्या गोलंदाजीवर लेनिंगचा वृंदाने झेल टिपला. लेनिंगने 43 चेंडूत 6 चौकारांसह 51 धावा जमविल्या. लेनिंग बाद झाली, त्यावेळी दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी केवळ एका धावेची गरज होती. रॉड्रिग्जने विजयी चौकार ठोकून सोपस्कार पूर्ण केले. शेफाली वर्माने 43 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 64 धावा जमविल्या. युपी वॉरियर्सतर्फे इक्लेस्टोनने 31 धावात 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक - युपी वॉरियर्स 20 षटकात 9 बाद 119 (सेहरावत 45, हॅरिस 17, हिली 13, नेवगिरे 10, खेमार 10, अवांतर 10, राधा यादव 4-20, कॅप 3-5, रे•ाr 1-16, सदरलँड 1-32), दिल्ली कॅपिटल्स 14.3 षटकात 1 बाद 123 (लेनिंग 43 चेंडूत 6 चौकारांसह 51, शेफाली वर्मा 43 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 64, रॉड्रिग्ज नाबाद 4, अवांतर 4, इक्लेस्टोन 1-31).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article