महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाणीपुरीची गाडी चोरणाऱ्या तरुणाला अटक

06:22 AM Oct 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

पाणीपुरीची गाडी चोरणाऱ्या एका तरुणाला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून त्याचा शोध घेण्यात आला आहे. त्याच्याजवळून पाणीपुरीची गाडी जप्त करण्यात आली आहे.

Advertisement

सचिन चन्नप्पा हसणण्णवर (वय 26, मूळचा रा. होगर्ती, ता. बैलहोंगल, सध्या रा. ऑटोनगर) असे त्याचे नाव आहे. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी, उपनिरीक्षक त्रिवेणी नाटीकार, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. के. मिटगार, बी. एम. नरगुंद, खादर खानमनवर, गोविंद पुजारी, रमेश बीसबडगी, नागाप्पा बिरगोंड, एफ. बी. मुजावर आदींनी ही कारवाई केली आहे.

बेलदार छावणी, सदाशिवनगर येथील श्रीनिवास धोंडिबा कामकर (वय 47) हे सदाशिवनगर येथील बाळीगा इस्पितळासमोर पाणीपुरीची गाडी लावतात. आई आजारी असल्यामुळे ते घरी असताना 21 सप्टेंबर 2024 च्या सायंकाळी 5 पासून 2 ऑक्टोबर यावेळेत पाणीपुरीची गाडी चोरण्यात आली होती.

यासंबंधी श्रीनिवास यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. सीसीटीव्ही फुटेजवरून सचिनला अटक करण्यात आली असून त्याने चोरलेली पाणीपुरीची गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article