For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

कराडात भरदिवसा युवकावर चाकूने वार करून खून

05:41 PM Dec 02, 2023 IST | Kalyani Amanagi
कराडात भरदिवसा युवकावर चाकूने वार करून खून

कार्वेनाका येथील घटना: घटनास्थळी पोलीस दाखल

Advertisement

येथील कार्वेनाका परिसरात भरदिवसा युवकावर एकाने चाकूने वार करून खून झाला. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली असून हल्लेखोर संशयित फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. खुनाचे कारण समजू शकले नाही. शुभम रविंद्र चव्हाण (वय 22, रा. वडोली निळेश्वर, ता. कराड) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, येथील कार्वे नाका येथे शनिवारी दुपारी तीन च्या सुमारास शुभम चव्हाण याच्यावर अज्ञाताने चाकूने वार करून गंभीर जखमी केले. हल्लेखोर संशयित घटनास्थळावरुन पसार झाला आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी शुभमला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, गुन्हेप्रकटीकरण शाखेचे पोलीस उपरिक्षक राजू डांगे यांच्यासह कर्मचारी तात्काळ धाव घेतली. संशयित हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.