महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उसाच्या मळ्यात गांजा पिकविणाऱ्या युवकाला अटक

10:47 AM Oct 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जिल्हा सीईएन विभागाची कुरुबगट्टी येथे कारवाई

Advertisement

बेळगाव : विक्रीसाठी आपल्या शेतात गांजा पिकविणाऱ्या कुरुबगट्टी (ता. सौंदत्ती) येथील एका युवकाला अटक करण्यात आली आहे. जिल्हा सीईएन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुरुबगट्टी येथे ही कारवाई केली असून 27 किलो कच्चा गांजा जप्त केला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख श्रुती एन. एस. व आर. बी. बसरगी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सीईएनचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी ही कारवाई केली आहे. जप्त गांजाची किंमत 1 लाख 35 हजार रुपये इतकी आहे.

Advertisement

गंगप्पा मल्लप्पा सन्निंगण्णवर (वय 43 रा. कुरुबगट्टी) असे पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. उसाच्या मळ्यात गंगाप्पाने गांजा पिकविला होता. यासंबंधीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर, उपनिरीक्षक एच. एल. धर्मट्टी, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए. एच. बजंत्री, टी. के. कोळची, ए. एन. मसरगुप्पी, एन. एल. गुडेन्नवर, एन. आर. फडप्पनवर आदींनी उसात छापा टाकून 18 गांजाची झाडे जप्त केली. गांजा, हेरॉईन, पन्नीसह अमली पदार्थांची विक्री थोपविण्यासाठी बेळगाव शहर व जिल्हा पोलिसांनी मोहीम उघडली आहे. गुप्त माहितीच्या आधारे जिल्हा सीईएन विभागाने 27 किलो कच्चा गांजा जप्त केला असून या कारवाईचे पोलीस प्रमुखांनी कौतुक केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article