महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

महालक्ष्मी यात्रेला जाताना तरुणावर काळाचा घाला

11:12 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बसरीकट्टी मार्गावरील दुर्घटना : संपर्क रस्त्याचा अंदाज न आल्याने गटारीत कोसळली दुचाकी

Advertisement

वार्ताहर /सांबरा

Advertisement

मुतग्याहून बसरीकट्टीला संपर्क रस्त्यावरून जाताना नवीन रस्त्याचा अंदाज न आल्याने गटारीत पडून झालेल्या अपघातात मुतग्याचा युवक जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी रात्री साडेअकरा ते साडेबाराच्या सुमारास घडली असून मंगळवारी सकाळी उघडकीस आली. गावातील शिवजयंती उत्सवाची मिरवणूक संपवून सोमवारी रात्री उशिरा बसरीकट्टी येथील महालक्ष्मी यात्रेसाठी जाताना हा अपघात घडला. श्याम नागाप्पा केदार (वय 47) राहणार व्यंकटेशनगर, मुतगा असे मयत तरुणाचे नाव आहे. सोमवारी रात्री शाम केदार हा गावातील शिवजयंती उत्सवाची मिरवणुकीत सहभागी होता.  ही मिरवणूक सपल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा बसरीकट्टी येथील यात्रेसाठी चालला होता. उशीर फार झाला आहे, आता जाऊ नकोस असे सांगत कुटुंबीयांनी त्याला जाण्यास रोखले होते. मात्र कुटुंबीयांचे न ऐकता केए 22 ईए 3727 ही दुचाकी घेऊन बसरीकट्टीकडे निघाला. अलीकडेच श्री महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर बसरीकट्टी-मुतगा असा नवीन संपर्क रस्ता बनविण्यात आला आहे. मुतगा गावानजीक असलेल्या एका लेआऊटमधून पुढे बसरीकट्टी शिवारांमधून हा रस्ता गावाला जाऊन पोहोचतो. या रस्त्यावरून जाताना लेआऊटमधील रस्त्याचा अंदाज न आल्याने तो सरळ रस्त्याने पुढे गेला व रस्ता संपल्यानंतर असलेल्या गटारीमध्ये दुचाकी घेऊन खाली कोसळला. यावेळी रस्त्यावर जोरात डोके आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

कुटुंबावर मोठा आघात

मयत शाम केदार हा मुतगा येथील वायुदल केंद्रातील मेसमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत होता.  तो घरचा कर्ता पुरुष होता. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. श्याम केदार हा उत्कृष्ट गोलंदाज म्हणूनही प्रसिद्ध होता. त्याने अनेक क्रिकेट स्पर्धाही गाजवल्या होत्या. त्याच्या निधनाने पूर्वभागातील क्रिकेटप्रेमींतून व ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मारीहाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा इस्पितळाला पाठविला. सायंकाळी शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. श्याम केदार यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा व दोन भाऊ असा परिवार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article