7 वर्षांत 20 वेळा ‘वधू’ झालेली युवती
कारण जाणून घेतल्यावर व्हाल चकित
विवाह तसेज जन्मोजन्मीचे नाते आहे. विवाहाच्या नात्यात पडण्यापूर्वी माणूस अत्यंत विचार करत असतो. परंतु काळ बदलण्यासोबत या नात्याचा अर्थही बदलला आहे. काही लोक केवळ समाजासाठी विवाह करतात. तर काही जण समाजाच्या दबावापोटी विवाह करत असतात. याचमुळे विवाह एक संस्कार नव्हे तर काही ठिकाणी थट्टेचा विषय ठरला आहे.
चीनमधून एका अशाच युवतीची कहाणी समोर आली आहे. चीनमध्ये एक युवती केवळ देखाव्यासाठी लोकांची वधू होते. हा विवाह तिच्यासाठी एखाद्या सीरियलमध्ये काम करण्यासारखा असतो आणि याच्या माध्यमातून ती पैसे कमाविते. तिचे आतापर्यंत 20 विवाह झाले असले तरीही ती आजवर अविवाहितच आहे.
चीनमधील काओ मेई नावाच्या युवतीने कमाईचा वेगळा मार्ग निवडला आहे. समाजातील विवाहाच्या दबावामुळे त्रस्त असलेल्या लोकांसाठी ती वधू होते. काओ मागील 7 वर्षांपासून हे काम करत आहे. चेंगदू येथे राहणाऱ्या काओने 2018 मध्ये स्वत:च्या एका मित्राची गर्लफ्रेंड असल्याचे नाटक केले होते. यानंतर तिने याला स्वत:चा व्यवसायच करून टाकले. ती समाजाच्या दबावाला तोंड देणाऱ्या लोकांची मदत करण्यासाठी त्यांची गर्लफ्रेंड किंवा पत्नी होते. मागील 7 वर्षांमध्ये तिने 20 विवाह केले आहेत. ती यात लोकांसाठी त्यांची वधू होत असते.
उत्तम कमाई
युवती कुठल्याही विवाहाच्या कायदेशीर पैलूत अडकून पडू इच्छित नाही, याचमुळे केवळ सोहळ्यांमध्ये पत्नी आणि गर्लफ्रेंड असल्याचा अभिनय करते. सोहळ्यात ती विवाहासाठीचा विशेष पोशाख घालते आणि त्याचा आनंद घेताना दिसून येते. काओ या कामासाठी तासाच्या हिशेबाने 1500 युआन म्हणजेच 18 हजार रुपये आकारत असते. मी स्वत:च्या या कामातून सामान्य नोकरीपेक्षा अधिक कमाई करत असते. ती स्वत:ला लाइफ अॅक्टर संबोधिते, जी लोकांचे जीवन सुलभ करण्यासाठी अभिनय करत असते.