पायाची नखं विकणारी युवती
सद्यकाळात पैसे कमाविणे मोठी गोष्ट नाही, केवळ तुम्हाला पैसे कमाविण्याच्या मार्गांविषयी माहिती असायला हवे. अनेक लोक आयुष्यभर मेहनत करून पैसे साठवत असतात. तर काही लोक पैसे कमाविण्याचे असे मार्ग शोधून काढतात की कमी मेहनतीत अधिक लाभ होतो. असेच काहीसे एका युवतीने केले आहे. ही युवती स्वत:च्या पायांची नखं विकून पैसे कमाविते. एकावेळी तिने 42 हजार रुपयांपर्यंतची कमाई केली आहे.
इन्स्टाग्राम युजर विवियनच्या अकौंटवर तुलनेत कमी फॉलोअर्स आहेत, परंतु तिच्या रील्स प्रचंड व्हायरल हातात. कारण आहे तिची अजब बिझनेस आयडिया. ती स्वत:च्या रील्समध्ये बिझनेस आयडियाविषयी सांगते, विवियन स्वत:च्या पायांची नखं कापून लोकांना विकते. तिच्या नखांना सुमारे 500 डॉलर्स (42 हजार रुपये) पर्यंत खरेदी केले जाते. एका व्हिडिओत तिने पायांची नखं कापण्यापासून ती एका पाकिटात भरून फीट फाइंडर नावाच्या वेबसाइटवर विकत असल्याचे दाखविले आहे.
ती केवळ स्वत:च्या पायांची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट करूनही पैसे कमाविते. याचबरोबर काही लोक तिने वापरलेले फुट मास्कही मागतात. काही लोक सॉक्सची मागणी करत असतात. तिच्या व्हिडिओला 2 कोटीहून अधिक ह्यूज मिळाल्या आहेत. तर अनेक लोकांनी कॉमेंट केली आहे.