कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

युवतीला अत्यंत अजब आजार

07:00 AM Apr 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

घरात घालते 6 जोड्या सॉक्स

Advertisement

जगात अनेक प्रकारचे आजार असून त्यामुळे लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. लोक स्वत:चे दैनंदिन काम देखील नीटपणे करू शकत नाहीत. इंग्लंडमधील एका 25 वर्षीय युवतीला अशाचप्रकारचा त्रास आहे. तिला एक असा आजार आहे, ज्यामुळे तिला घरात देखील 6 जोडी सॉक्स घालून रहावे लागते. तर फ्रीज उघडताना तिला हातात ग्लोव्हज घालावे लागतात.  असे न केल्यास तिचे जगणे अवघड ठरते.

Advertisement

विंचेस्टर येथे राहणारी फिटनेस ट्रेनर एलेन फिट्जगिब्बिन्सला अत्यंत विचित्र आजार आहे. यामुळे तिला दैनंदिन कामे करण्यास मोठा त्रास होतो. तिला रेनॉड्स सिंड्रोम असून या आजारात हिवाळ्यामुळे माणसाच्या शरीरावर लाल डाग तयार होऊ लागतात, यामुळे वेदना सुरू होते, हा प्रकार अतिथंडी, चिंता आणि गोंधळवेळी माणसांना होतो. हा एकप्रकाराचा ऑटो इम्यून आजार आहे.

तिची स्थिती इतकी वाईट आहे की तिला घरात देखील 3-6 जोडी सॉक्स एकाचवेळी घालावे लागतात. ती हीटरचा देखील वापर करते, परंतु विजेचे बिल अधिक येत असल्याने ती आता प्रत्येकवेळी हीटर चालू करत नाही. परंतु यामुळे तिचे पाय पिवळे पडू लागतात आणि हातांवर लाल फोड येतात, जे वेदना देतात. फ्रिजमधून खाद्यपदार्थ बाहेर काढायचे असतील तर तिला ग्लोव्हज वापरावे लागतात. जर ती कुठल्याही भांड्यात ठेवलेले खाद्यपदार्थ खात असेल तर ते भांडे ती हातात पकडत नाही, तर स्नान करून बाहेर पडल्यावर तिला अधिक थंडी जाणवते.

2019 मध्ये निदान

2019 तिला हा आजार झाला असल्याचे कळले होते. 2021 मध्ये तिला कोएलिएक आजार झाला होता, जो एक प्रकारचा ऑटो इम्यून आजार आहे. याचबरोबर तिला ग्लुटनमुळे रिअॅक्शन होऊ लागली होती. आता तिला खास प्रकारच्या डायटचा पालन करावे लागते. ती अधिक थंड पदार्थ खाऊ शकत नाही. तरीही ती एक फिटनेस ट्रेनर असून लोकांना आरोग्यदायी राहण्याचे मार्ग शिकवत असते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article