महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

घरफोडी करणाऱ्या तरुणाला अटक

11:38 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शहापूर पोलिसांची कारवाई

Advertisement

बेळगाव : शहापूर परिसरात घरफोडी करणाऱ्या एका तरुणाला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून सुमारे 70 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. बुधवारी ही कारवाई करण्यात आली आहे. फरदीन नूरअहमद शेख (रा. वझे गल्ली बोळ-विष्णू गल्ली, वडगाव) असे त्याचे नाव आहे. शहापूरचे पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. आय. सनदी, हवालदार एस. एम. गुडदेगोळ, सुरेश कांबळे, आनंद खोत, हणमंत विभुती, गंगव्वा पार्वती आदींनी ही कारवाई केली आहे. फरदीनला अटक करून त्याची कसून चौकशी केली असता शहापूर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील कलमेश्वरनगर येथे घरफोडी केल्याची त्याने कबुली दिली. त्याच्याजवळून चोरी प्रकरणातील सोन्याची चेन, कारच्या चाव्या, गेटच्या चाव्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याने आणखी कोठे चोऱ्या केल्या आहेत का? याचा तपास करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article