For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची नैराश्येतून आत्महत्या

10:47 AM Apr 17, 2024 IST | Abhijeet Khandekar
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची नैराश्येतून आत्महत्या
Advertisement

अखेरच्या दिवशी वेळेत कागदपत्रे अपलोड न झाल्याने नैराश्य

कोल्हापूर प्रतिनिधी

पोलिस भरतीची शेवटची संधी असताना सर्व्हर डाऊनची तांत्रिक अडचण आणि कागदपत्रांची वेळेत पूर्तता होत नसल्याच्या नैराश्यातून तरुणाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. रंगराव बाळासो फाटक (वय 28, रा. महाडिकवाडी, पोस्ट कसबा ठाणे) असे मृत तरुणाचे नांव आहे. मंगळवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार महाडिकवाडी (ता. पन्हाळा) येथे घडला.

Advertisement

सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, रंगराव फाटक हा महाडिकवाडी येथे आई, वडील, मोठा भाऊ आणि वहिणी यांच्यासोबत राहत होता. सैन्य दलात भरती होण्याचा त्याचा प्रयत्न अपयशी ठरला. वयोमर्यादा संपल्यानंतर त्याने पोलिस भरतीसाठी प्रयत्न सुरू केले. काही महिने तो आसुर्ले-पोर्ले (ता. करवीर) येथील एका अॅकॅडमीत भरतीची तयारी करीत होता.

वयोमर्यादेनुसार खुल्या प्रवर्गातील रंगराव याच्यासाठी पोलिस भरतीची अखेरची संधी होती. त्यासाठी तो कसून सराव आणि अभ्यास करीत होता. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर त्याला ओटीपी मिळाला नाही. यामुळे तो अर्ज भरू शकला नाही. काही कागदपत्रांची वेळेत पूर्तता होत नसल्याने तो निराश होता. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घरात वरच्या मजल्यावर छताच्या फॅनला दोरीने गळफास घेतल्याच्या स्थितीत तो वडिलांना आढळला. तातडीने गळफास सोडवून त्याला सीपीआरमध्ये दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याचे वडील शेती करतात, तर भावाचे हार्डवेअर दुकान आहे. या घटनेची नोंद पन्हाळा पोलिस ठाण्यात झाली.

Advertisement

Advertisement
Tags :

.