कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एक युवक करतोय अजब काम

06:15 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जगात प्रत्येक जण कमीतकमी कामात अधिक पैसा मिळावा अशी इच्छा बाळगून असतो. याकरता कुणी स्वत:साठी एखादा रोजगार निवडतो, तर काही जण वेगळा मार्ग पत्करतात. एका इसमाने स्वत:साठी जे काम निवडले आहे, ते लोकांना चकित करत आहे. या इसमाला याकरता मोठी रक्कम मिळत आहे. जपानमध्ये राहणारा हा इसम अजब नोकरी करतो, तो वेगवेगळ्या महिलांकडून पैसे घेतो आणि त्याबदल्यात त्यांच्यासोबत राहून घरातील कामं करतो. ताकुया इकोमा नावाच्या 31 वर्षीय इसमाची लाइफस्टाइल सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Advertisement

जपानमध्ये राहणारा हा इसम केवळ महिलांच्या कमाईवर जगत आहे. तो वेगवेगळ्या महिलांकडून पैसे घेतो आणि त्या बदल्यात त्यांच्यासोबत राहून घरातील काम पूर्ण करतो. त्याची अजब नोकरी आणि लाइफस्टाइलविषयी जाणल्यावर लोक अवाक् झाले आहेत. परंतु ताकुया सहजपणे महिन्याकाठी 6 लाख रुपये कमावत आहे. ताकुया इकोमानुसार अशाप्रकारच्या जीवनासाठी त्याला अत्यंत भरपूर रिकामा वेळ आणि प्रचंड पैसा मिळतो, परंतु एकाचवेळी अनेक महिलांना मॅनेज करावे लागते. हे काम मजेशीर असले तरीही धावपळ करविणारे आहे.

Advertisement

ताकुयाला सर्वप्रथम क्लायंट्सकडे जाण्यापूर्वी तयार व्हावे लागते, मेकअप करावा लागतो, केस विंचरावे लागतात आणि चांगले कपडे घालावे लागतात. तेथे पोहोचल्यावर तो त्यांच्यासोबत खातो-पितो. संभाषण करतो आणि भावनात्मक स्वरुपात सपोर्ट देखील देतो. या महिलांच्या घरातील कामं म्हणजेच कचरा काढणे, भांडी घासणे आणि बाथरुम साफ करणे देखील त्याला करावे लागते. त्याला 3 तासांसाठी या कामाकरता सुमारे 94 हजार रुपये मिळतात. एकावेळी मी 15 क्लायंट्सकडून 6 लाख रुपये केवळ 8 दिवसात कमावत होतो, परंतु कोविडनंतर ही संख्या केवळ 7 वर आली. यामुळे आता मला नवे मार्ग निवडत क्लायंट टिकवावे लागणार असल्याचे त्याचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article