महागड्या फोनची विचारणा केल्याने न्यू वैभवनगरातील तरुणाची आत्महत्या
बेळगाव : महागडा फोन का घेतलास? अशी वडिलांनी विचारणा केल्यामुळे न्यू वैभवनगर येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुस्ताफिज अब्दुलरशीद शेख (वय 24) रा. न्यू वैभवनगर असे त्या तरुणाचे नाव आहे. व्यवसायाने तो फॅब्रिकेटर होता. गुरुवार दि. 3 एप्रिल रोजी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे दोरी कापून त्याला वाचवण्यासाठी खासगी इस्पितळात हलविण्यात आले. मात्र,त्याआधीच त्याचा मृत्यू झाला. एपीएमसी पोलीस स्थानकात याविषयी एफआयआर नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. उपलब्ध माहितीनुसार मुस्ताफिजने 70 हजार रुपयांचा फोन खरेदी केला होता. मुलावरील काळजीपोटी वडिलांनी इतका महागडा फोन कशासाठी घेतलास? अशी विचारणा केल्यामुळे झालेल्या मन:स्तापातून त्याने आपले जीवन संपविले आहे.