अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याला युवकाची आत्महत्या
सातारा :
सातारा शहरात यादोगोपाळ पेठेत राहणारा किरण गोविंद काळे (वय 27) याचा माची पेठेत अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याला रविवारी सकाळी गळफास लावलेल्या अवस्थेत मृतेदह आढळून येताच त्याच्या कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला. स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने मृतदेह सोडवून शासकीय सोपस्कार पूर्ण करुन संगममाहुली येथील कैलास स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झालेली होती.
किरणच्या घरामध्ये त्याचे वडील, आई, भाऊ, बहिण असे कुटुंब असून गेल्या काही दिवसांपासून घरामध्ये वातावरण बिघडले होते. त्याच आलेल्या तणावातून त्याने साडीने गळफास लावून घेवून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, त्याने माची पेठेत अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याला आत्महत्या केली. त्या ठिकाणापासूनच काही अंतरावर त्याच्या मामाचे घर असून किरण काळे हा सर्वांशी मिळून मिसळून असायचा. त्याने आत्महत्या केल्याची बाब प्रथम पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यास पहाटे कळली. त्यानंतर स्थानिकांना व कुटुंबियाना कळताच सातारा शहर पोलीस व स्थानिकांनी शासकीय प्रक्रिया पूर्ण करुन मृतदेह झाडावरुन खाली उतरवला. दुपारी कैलास स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.