For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रेम प्रकरणातून विवाह झालेला तरुण निर्दोष

06:17 AM Mar 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रेम प्रकरणातून विवाह झालेला तरुण निर्दोष
Advertisement

विशेष पोक्सो न्यायालयाचा निकाल

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

प्रेम प्रकरणातून विवाह झाला. घरच्यांनीही मान्यता दिली. मात्र मुलगी आजीच्या गावी आली असताना नंदगड (ता. खानापूर) पोलीस स्थानकामध्ये लग्न करून घेतलेल्या तरुणाच्या विरोधात पोलिसांनी जाणूनबुजून गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयात दोषारोपही दाखल झाले. मात्र मुलगी आणि तिच्या घराच्यांनी विवाह झाल्याचे न्यायालयासमोर सांगितल्याने कोल्हापूरच्या त्या तरुणाची निर्दोष मुक्तता केली आहे.

Advertisement

शुभम मोहन शिंदे (वय 22, रा. कोल्हापूर) असे त्या तरुणाचे नाव आहे. शुभम याचे एका तरुणीवर प्रेम होते. त्याने रितसर विवाह केला. त्यानंतर सदर तरुणी नंदगड येथील आपल्या आजीच्या गावी आली. ती अल्पवयीन असताना तिचे लग्न केले, अशी माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्या तरुणीला पोलीस स्थानकात नेऊन संबंधित तरुणाच्या विरोधात तक्रार देण्यास सांगितले. मला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर माझे लग्न झाले आहे, असे तिने पोलिसांना सांगितले होते.

त्यानंतरही पोलिसांनी संबंधित कोल्हापूरच्या तरुणावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्याला अटक करून कारागृहात पाठविण्यात आले. त्यानंतर न्यायालयामध्ये नंदगड पोलिसांनी दोषारोप दाखल केले. त्याठिकाणी तरुणीने, तसेच तिच्या कुटुंबीयांनी आम्ही तिचा विवाह केला आहे, यामध्ये त्या मुलाचा कोणताही दोष नसल्याचे न्यायालयात सांगितले. त्यामुळे विशेष पोक्सो न्यायालयाने त्या तरुणाची निर्दोष मुक्तता केली आहे. त्या तरुणाच्यावतीने अॅड. रोहित लातूर यांनी काम पाहिले.

Advertisement
Tags :

.